सासरा आणि पत्नी घरात झोपलेले असतानाच जावई पोहोचला अन्...; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

Crime News: घरगुती भांडणातून जावयाने सासरा, पत्नी आणि मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी जावई सध्या फरार असून पोलीस शोध घेत आहेत.   

Updated: Feb 15, 2023, 11:40 AM IST
सासरा आणि पत्नी घरात झोपलेले असतानाच जावई पोहोचला अन्...; संपूर्ण जिल्ह्यात खळबळ title=

Crime News: घरगुती भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नी, मुलासह सासऱ्यालाही जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया शहरातील सुर्याटोला येथे ही घटना घडली आहे. आरोपी जावई किशोऱ शेंडे याने रात्री झोपेत असताना सासरे देवानंद मेश्राम (52), पत्नी आरती किशोर शेंडे (35), आणि मुलगी जय किशोर शेंडे (4) यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून टाकलं. पोलीस सध्या आरोपी जावईचा शोध घेत आहे. 

रात्री 12 ते 1 च्या सुमारास ही घटना घडली. देवानंद मेश्राम यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. दरम्यान आरती आणि जय हे 90 टक्के जळाले असुन त्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. जावई फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोज भांडण होत असल्याने आरती किशोर शेंडे मुलीला घेऊन सासर सोडून माहेरी निघून आल्या होत्या. पती मारहण करत असल्याने आरती शेंडे गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होत्या. घटना घडली त्यादिवशी सासरे देवानंद मेश्राम, आरती शेंडे आणि जय शेंडे जेवण करुन झोपले होते. 

रात्री 12 ते 1 च्या सुमारास किशोर शेंडे तिथे पोहोचला आणि त्याने तिघांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. यानंतर त्याने तेथून पळ काढला. देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची पत्नी आणि मुलगी 90 टक्के जळाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.