Maharashtra Farmer: वांग्याला मिळाला एक रुपये किलोचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी केलं असं काही की संपूर्ण बाजार बघत राहिला

Maharashtra Farmer: सध्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. जालना येथील रेणुकाई पिंपळगाव येथील आठवडी बाजारात वांग्यांना केवळ एक रुपया किलोचा दर मिळाला आहे. 

Updated: Mar 22, 2023, 08:11 PM IST
Maharashtra Farmer: वांग्याला मिळाला एक रुपये किलोचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी केलं असं काही की संपूर्ण बाजार बघत राहिला title=

नितीश महाजन, झी मीडिया, जालना: लहरी हवामानाचा जबर फटका शेतकऱ्याला बसला आहे (Maharashtra Farmer).  जालना (Jalana) येथील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने वाग्यांचे पिक घेतले. बाजारात या वांग्यांना एक रुपये किलोचा भाव मिळाला ( brinjal fetched 1 Rs per kg). यामुळे शेतकरी संतप्त झाला. शेतकऱ्याने यानंतर बाजारातच आपला आक्रेोश व्यक्त केला.  

सध्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. जालना येथील रेणुकाई पिंपळगाव येथील आठवडी बाजारात वांग्यांना केवळ एक रुपया किलोचा दर मिळाला आहे.  सध्या बाजारपेठेत कांदा, वांगी, टोमॅटो, मेथी या भाजीपाल्याची आवक जास्त आहे. आवक वाढल्यामुळे  भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

रेणुकाई पिंपळगाव येथील शेतकरी रामेश्वर देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर वांग्यांची लागवड केलेली आहे. आठवडी बाजारात चांगला भाव मिळेल म्हणून त्यांनी चार मजूर लावून वांग्यांची तोडणी करून 2 क्विंटल वांगे विक्रीसाठी बाजारात आणले होते. पण, किलोला केवळ एक रुपया दर मिळल्याने रामेश्वर देशमुख यांनी 2 क्विंटलं वांगी बाजारातच फेकून दिली.

एक किलो वांग्याला 27 पैशांचा दर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात (Shirol taluka of Kolhapur district) वांग्याला 27 पैसे किलोचा दर मिळाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हा धक्कादायक प्रकार घडला होता. विक्रमसिंह जगदाळे या शेतकऱ्यासह हा प्रकार घडला. जगदाळे यांना फक्त वांगी तोडणी आणि वहातुक खर्चासाठी अडीच हजार रुपये इतका खर्च आला होता.

कांदे विकल्यावर शेतकऱ्याला मिळाला दोन रुपयांचा चेक

सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी 17 फेब्रुवारीला पाच क्विंटल कांदा सोलापूर मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे विकला. मात्र, गाडीभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याचा फक्त दोन रुपये मिळाले.10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक देण्यात आला. 

शेतकऱ्यांची थट्टा

अवकाळी पावसामुळे शतेकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मातीमोल दरानं शेतमाल विकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. अवकाळी पावासामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.