Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर प्रेमीयुगुलाचा करुण अंत... भरधाव ट्रकनं चिरडलं

Samruddhi Mahamarg Accident : समृध्दी महामार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरात या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. तिच्यासह असीम उर्फ बुच्चन अब्बास (वय २० वर्षे)  नावाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. असीम आणि या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. दोघेही घरातून पळून आले होते. 

Updated: Jan 19, 2023, 06:30 PM IST
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर प्रेमीयुगुलाचा करुण अंत... भरधाव ट्रकनं चिरडलं title=

Maharashtra Samruddhi Mahamarg Accident : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  (Samruddhi Express Way) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका प्रेमीयुगुलाचा समृध्दी महामार्गावर करुण अंत झाला आहे. एका भरधाव ट्रकने दोघांना चिरडलं. दोघे दिल्लीतून पळून आल्याची माहिती आता समोर आली आहे. दुसरीकडे, मृत तरुण आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट नकार दिला आहे. 

समृध्दी महामार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरात या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. तिच्यासह असीम उर्फ बुच्चन अब्बास (वय २० वर्षे)  नावाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. असीम आणि या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. दोघेही घरातून पळून आले होते. 

17 जानेवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास या दोघांना मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावरील औरंगाबाद येथील सावंगी परिसरात भरधाव ट्रक या दोघांना चिरडले. या अपघातात दोघेही ठार झाले. समृद्धी महामार्गावर ताशी 120  किलोमीटर वेग मर्यादा बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण ही वेग मर्यादा मोडतात. यामुळे समृद्धी महामार्गावर अपघाताच्या देखील घटना घडत आहेत.  समृद्धी महामार्गावर पादचाऱ्यांना बंदी आहे. असे असताना देखील हे दोघे समृद्धी महामार्गावर पायी का चालत होते. ते कुठे जात होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

हे दोघे दिल्लीहून औंरगाबादला कसे आले? याबाबत समजू शकलेले नाही. पोलिसांनी या दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. 

समृद्धी महामार्गावर स्टंटबाजीचा

समृद्धी महामार्गावर दुचाकी तसेच तीन चाकी रिक्षा यांना परवानगी नाही. यामुळे पादचाऱ्यांना देखील येथे जाण्यास, मनाई आहे. त्यातच  समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा इंटरचेंजजवळ काही तरुणांनी स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.  चार-पाच टवाळखोर समृद्धी महामार्गावरच्या मधल्या लेनपर्यंत जात स्टंटबाजी करत तरुणांनी फोटोशूट केले. या व्हायरल व्हिडिओ मध्ये काही तरुण हातात मोठा झेंडा घेवून फोटोशूट करताना दिसत आहेत. 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग  (Samruddhi Express Way) प्रवासांसाठी खुला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाले. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्यांना जोडतो. हा मार्ग खुला  झाल्यापासून दररोज लाखो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत.