मुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रिक्षातच तरुणाने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली आहे. 

Updated: Jun 19, 2023, 07:14 PM IST
मुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना title=
A 30 year old woman was allegedly murdered by her boyfriend inside an autorickshaw

Mumbai Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईत पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षातच एका 30 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. महिलेच्या प्रियकरानेच हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आले आहे. 

प्रेयसीवर केले वार

मुंबईतील साकीनाका परिसरात असलेल्या खैरानी भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. दोघेही रिक्षातून प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक आरोपीचे महिलेसोबत वाद झाले होते. त्या वादातूनच त्याने तिचा रिक्षातच गळा चिरुन तिची हत्या केली आहे. इतकंच नव्हे तर आरोपीने स्वतःवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे. 

 

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपीने महिलेवर वार स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र वेळेत त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. आरोपीवर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. तर, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून. हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हॉस्टेलमध्ये तरुणीवर अत्याचार

गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चगेट परिसरात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात एका 19 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती. मुलीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. वसतिगृहातील मुलींना तिचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला होता. वसतिगृहातीलच सुरक्षा रक्षकाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते. मुलीची हत्या केल्यानंतर सुरक्षा रक्षकानेही आत्महत्या करुन जीवन संपवले होते. 

मिरारोडमध्ये तरुणीचा निर्घृण खून

मिरारोड परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरचा प्रियकरानेच निर्घृण खून करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची खळबळजनक घटना घडली होती. मनोज साने असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर, मयत तरुणीचे नाव सरस्वती साने असून ती अनाथ असल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत होता.