मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.
त्यामुळं साईबाबांच्या दानपेटीत तब्बल 14 कोटी 82 लाख रूपयांचं विक्रमी दान जमा झालंय. नाताळच्या सुट्टीत चार दिवसात 5 कोटी 30 लाख रूपयांचं दान भाविकांनी केलं. तर नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीत आलेल्या भाविकांनी साईबाबांना 3 कोटी 31 लाख रूपयांचं दान दिलं, अशी माहिती शिर्डी साई संस्थाननं दिलंय. वीकेंडला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळं दानपेटीत विक्रमी रक्कम गोळा झालीय.
अनेक जण नव वर्षाचं स्वागत ही साई बाबांच्या दर्शनाने घेतात. तसेच नव्या वर्षाची आणि नव्या संकल्पाची सुरूवात ही साईबाबांच्या दर्शनाने व्हावी अशी मनोकामना मनात धरून अनेक भाविक 31 डिसेंबर रोजीच शिर्डीत दाखल होतात.