असा रस्ता त्या ७ भावी डॉक्टरांचा जीव घेऊन गेला, चूक सुधारली नाही तर आणखी जीव जातील?

वर्ध्याजवळ ज्या ७ मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जीव गेला, तिथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली आहे, ती सुधारण्याची गरज आहे.

Updated: Jan 27, 2022, 02:40 PM IST
असा रस्ता त्या ७ भावी डॉक्टरांचा जीव घेऊन गेला, चूक सुधारली नाही तर आणखी जीव जातील? title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : वर्ध्याजवळ ज्या ७ मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जीव गेला, तिथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली आहे, ती सुधारण्याची गरज आहे. ती त्या ठिकाणीच नाही तर यावर अभ्यास करुन देशात ज्या ज्या ठिकाणी अशी चूक होत आहे, असं वाटत असेल तर ती सुधारण्याची नक्कीच गरज आहे, नाही तर ही चूक अनेकांचे जीव घेऊ शकते. (7 mbbs students from Wardha in Vidarbha died due to a big mistake on the highway)

वेगा एवढाच सुरक्षिततेचा दावा असावा...

देशात आणि राज्यात जेव्हा ४ - ४ पदरी हायवे बनवले जात आहेत, अधिक वेगाने आपण इच्छीत ठिकाणी पोहोचण्याचे दावे केले जात आहेत, तेव्हा रस्त्यांचे वळण आणि पुलावरुन जाणारा मार्ग अपघाताला शून्य टक्के आमंत्रण देणारा असला पाहिजे. एवढ्या वेगात एक पूल ओलांडताना, रस्ता तयार करताना झालेली छोटीशी चूक अनेकांचे सतत जीव घेत असेल, तर रस्त्यातच खोट आहे हे सिद्ध होतं.

संबंधित विभाग अभ्यास करुन तरी ही चूक सुधारतील?

वर्ध्यात ज्या ठिकाणी ७ भावी डॉक्टर गमावले गेले आहेत, तेथे एक चूक वाटतेय, ती जर या यापुढेही अपघातास आमंत्रण देणारी ठरली तर अनेकांचे जीव जातील, ते जावू नयेत असंच सर्वांना वाटतं आणि संबंधित विभागही त्याकडे लक्ष देतील.

ही गाडी नेमकी कुठे ठोकली गेली?

वर्ध्यात ज्या ठिकाणी या ७ मेडिकलच्या विद्यार्थ्यांची गाडी ठोकली गेली आहे, तो भाग हा रस्त्यावरच्या दोन पुलांच्या मधला भाग आहे, एका रोड डिव्हायडरला नाही, तर दोन येणाऱ्या आणि जाणाऱ्या पुलांमध्ये जी भिंत आहे, त्याला ही गाडी धडकली आहे, आणि वेगात हे होण्याची शक्यता अधिक असते.

२ पुलांमध्ये अशी १२ फुटांची भिंत असेल तर सुरक्षिततेसाठी काय अपेक्षित आहे...

असा २ पुलांच्यामध्ये उभा डिव्हाईडर येत असेल, तर साधारण १०० ते १५० मीटर पर्यंत सलग प्लास्टिकचे रात्री चमकणारे रिफ्लेक्टर रस्त्याच्यामध्ये लावणे गरजेचे आहे. समजा वाहन १२० ते १४० च्या स्पीडने असेल तर १०० ते १५० मीटर आधी चालक सावध होवू शकतो, की दोन पुलांच्या मध्ये मोठा डिव्हायडर आहे. समजा तो या प्लास्टिकच्या रिफ्लेक्टरला ठोकला गेला तरी मोठी हानी होणार नाही.

त्या १२ फुटाच्या भिंतीआधी १०० ते १५० मीटरपासून प्लास्टिकचे रिफ्लेक्टर असावेत...

वर्ध्याचा अपघात रोडच्या आजूबाजूच्या डिव्हायडरला गाडी ठोकून झालेला नाही, तो रस्त्याच्यामध्ये २ पुलांच्या मधोमध, १२ फुटांची जी भिंत आहे, त्या भिंतीला ही गाडी ठोकली गेली आहे... त्यातून आपण भावी ७ डॉक्टर गमावले ज्यांनी साधारण १ कोटी लोकांना आरोग्य सेवा आयुष्यात दिली असती.