कोल्हापूर येथील अपघातात ५ जागीच ठार

गडहिंग्लज - चंदगड मार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.  

Updated: Apr 13, 2019, 09:15 PM IST
कोल्हापूर येथील अपघातात ५ जागीच ठार title=

कोल्हापूर : गडहिंग्लज - चंदगड मार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. महागाव जवळ एसटी आणि सुमो गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली आणि अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की एसटीच्या घडकेत सुमोचा चक्काचुर झाला. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुमोतील नागरिक लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करुन घरी परतत होते. ते प्रचारासाठी असनगांवला गेले होते. शिवसेनेची सभा अटोपून परत घरी येत असताना सुमो चालकांचा गाडीवरचा ताबा सुटला. यावेळी समोरुन येणाऱ्या बसला सुमोने जोरदार धडक दिली. यात सुमोचा चक्काचूर झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची ओळख पटवायचे काम सुरु होते. या अपघातातील जखमींवर उपचार सुरु आहेत.