पुणे : पुण्याच्या सहकारनगर परिसरात तब्बल ४२ वाहनांचे सीटकव्हर ब्लेडने फाडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय. काही दिवसांपूर्वीच वारजे परिसरातील बापूजी बुवा चौकात उभ्या केलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात. आज सकाळी यातील ४२ वाहनांचे सीटकव्हर ब्लेडने फाडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये दोन रिक्षाचा समावेश आहे.
रहिवाशांनी सहकारनगर पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान या परिसरात सतत होणा-या अशा घटनांमध्ये नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.