मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यातल्या शहरांची कामगिरी उल्लेखनीय दिसून आली आहे. पहिल्या दहा मध्ये राज्यातील चार शहरांचा समावेश आहे. नाशिकनं राज्यात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. २०२० च्या पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड सहाव्या, नवी मुंबई आठव्या तर वसई-विरार १०व्या स्थानावर आहेत. देशात इंदूरनं सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे.
मध्य प्रदेशमधील इंदूरने पुन्हा एकदा स्वच्छता सर्वेक्षणमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. १० लाख लोकसंख्या असलेल्या इंदूरने स्वच्छता सर्वेक्षणच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत पहिला क्रमांक मिळवला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हटलं आहे. २०१८ च्या सर्वेक्षणात झारखंडला सर्वश्रेष्ठ कामगिरीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड होतं. मागच्या सर्वेक्षणेच्या तुलनेत यंदा नागरिकांच्या प्रतिक्रियेला खास महत्त्व देण्यात आलं होतं. इंदूरने मात्र आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
महाराष्ट्रातील महापालिका आणि नगरपालिका तसेच प्रशासनाला पहिला क्रमांक पटकवण्य़ासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.