मजुरांच्या मृत्यू प्रकरणी अखेर २४ तासांनंतर गुन्हा दाखल

क्रेन मधून पडून आठ मजूरांच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Nov 22, 2017, 01:17 PM IST
मजुरांच्या मृत्यू प्रकरणी अखेर २४ तासांनंतर गुन्हा दाखल  title=

ठाणे : क्रेन मधून पडून आठ मजूरांच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलीस ठाण्यात तब्बल २४ तासानंतर रात्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. सोमा कंपनीच्या चार कामगारांना या प्रकरणी अटकदेखील करण्यात आली आहे. 

कंपनीचे सेफ्टी मॅनेजर, मॅकॅनिकल इंजिनिअर, क्रेन ऑपरेटर अशा चार जणांचा अटक केलेल्यात समावेश आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. 

त्यांच्या विरोधात कामात निष्काळजीपणा करुन मजूरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना न केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. 

सोमा कंपनीच्या संचालकांवरदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. सोमा कंपनीचे संचालक हे प्रीन्सीपल एम्प्लॉयर आहेत. त्यामुळं, त्यांची जबाबदारी ते झटकू शकत नाहीत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एका स्थानिक युवकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय.