मेट्रोच्या खांबाला धडकून बाईकनं घेतला पेट; ठाण्यात भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Road Accident News: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाण्यात रस्ते अपघातात एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 28, 2023, 01:46 PM IST
मेट्रोच्या खांबाला धडकून बाईकनं घेतला पेट; ठाण्यात भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू title=
30 years old Man dies after his motorbike crashes into metro pillar in thane

Thane Accident News Today:  ठाण्यात एक भयंकर अपघात झाला आहे. घोडबंदर रोड येथे मेट्रोच्या (Metro)  खांबाला धडकून एका 30 वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. इतकंच नव्हे तर अपघातानंतर त्याच्या बाईकने पेट घेतला. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Thane Road Accident News)

गेल्याकाही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेकदा खड्डयांमुळं तर कधी कधी निष्काळजीपणांमुळंही अपघात होत असताता. ठाण्यातील या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातानंतर दुचाकीही जळून खाक झाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे 5.30च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी दुचाकीस्वार हा मिरा रोड येथील रहिवाशी आहे. दुचाकीस्वार घोडबंदर रोडहून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रोचे काम सुरू असलेल्या खांबाला त्याची दुचाकी आदळली. 

हा अपघाच इतका भीषण होता की दुचाकी खांबाला धडकल्यानंतर लगेचच पेट घेतला. तर, दुचाकीस्वारालाही गंभीर मार लागला होता. त्यामुळं जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यात आली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

कापूरबावडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला आहे.

दरम्यान, या पूर्वी वसईत खड्ड्यांमुळं एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. बहिणीचा वाढदिवस साजरा करायला जात असतानाच तिचा अपघाती मृत्यू झाला आहे. पूजा गुप्ता असं या विवाहित महिलेचे नाव आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. त्यावेळी मागे बसलेली पुजा खाली पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.