कोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; सांगली डेंजरझोनमध्ये

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थी गंभीर झालीय.. त्यामुळे NDRFची दुसरी टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 27, 2024, 10:33 PM IST
कोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; सांगली डेंजरझोनमध्ये title=

Kolhapur Rain Update :  कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी धनंजय महाडिक यांनी कर्नाटक मधील अलमट्टी धरण प्रशासनाशी योग्य समन्वय सुरू आहे. सध्या 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, गरज लागली तर आणखी विसर्ग वाढावा यासाठी केंद्राला विनंती केली आहे. पण सद्या कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीला अलमट्टी किंव्हा हिप्परगी धरण पूर्णतः जबाबदार नसून कोल्हापूर जिल्ह्यांत फ्री कॅचमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे म्हटले आहे. अलमट्टी किंवा हिप्परगी धरणाच्या सर्वात अधिक फटका सांगली जिल्ह्याला आणि त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला बसतो असं देखील महाडिक म्हणालेत

पूर परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने दीर्घ कालीन उपाययोजन करण्याची गरज - विश्वजीत कदम

कृष्णाकाठी निर्माण होणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी तात्पुरते नियोजन करण्यापेक्षा दीर्घ कालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत,काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली आहे.तसेच राज्य सरकारने गंभीरपणे या योजनांसाठी निधीची तरतूद करण्याची गरज असल्याचे देखील कदम यांनी स्पष्ट केले आहे,आमदार विश्वजीत कदम यांनी खासदार विशाल पाटील यांनी सांगली शहरातल्या पूर परिस्थितीची पाहणी केली आहे,शहरातल्या सूर्यवंशी प्लॉट,कर्नाळ रोड येथे आमदार विश्वजीत कदम यांनी पूरग्रस्तांशी संवाद देखील साधला आहे.

कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर परिस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्यासाठी सातत्याने आपण कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी.शिवकुमार यांच्या संपर्कात आहोत,त्यांनी शब्द दिलाय त्याप्रमाणे त्यांच्याकडून विसर्ग करण्यात येत असल्याचे देखील आमदार कदम यांनी स्पष्ट केले आहे

अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. 

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  दिल्या. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेवून अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.