पुण्यात अज्ञाताकडून २७ वाहनांची जाळपोळ

पुण्यात एका व्यक्तीनं 27 वाहनांची जाळपोळ केलीये.. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये.

Updated: Jul 9, 2017, 08:19 AM IST
पुण्यात अज्ञाताकडून २७ वाहनांची जाळपोळ title=

पुणे : पुण्यात एका व्यक्तीनं 27 वाहनांची जाळपोळ केलीये.. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये.

पर्वती जनता वसाहतीमधील गल्ली क्र.३८च्या पोलिस चौकीशेजारी ही घटना घडलीये.. इथल्या मोकळ्या आवारातील शौचालयाशेजारी वाहनं उभी करतात.. या वाहनांना मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं आग लावली.
 
यात एकूण 27 वाहने जळून खाक झाली असून त्यात 1 टेम्पो, 24 दुचाकी आणि 2 सायकल्सचा समावेश आहे.. या जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीये.. दारुच्या नशेत त्यानं हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिलीये..