अकोल्यात २० लाखाच्या जुन्या नोटा जप्त

या प्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवाशी राकेश तोहगावकर ताब्यात घेतलं आहे.

Updated: Jul 30, 2017, 07:10 PM IST
अकोल्यात २० लाखाच्या जुन्या नोटा जप्त title=

अकोला : अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाख रूपयांची रोकड पकडली आहे. काल रात्री खोलेश्वर स्थनिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये १ हजार आणि ५०० च्या जून्या नोटांचा समावेश आहे. यात हजारांच्या नोटांची किंमत ९ लाख तर पाचशेच्या नोटांची किंमत ११ लाख आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवाशी राकेश तोहगावकर ताब्यात घेतलं आहे.