पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता

पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता झाले आहेत. कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू आहे.

Updated: Aug 31, 2017, 02:18 PM IST
पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता title=

मुंबई : पालघर जिल्ह्यातल्या समुद्रात २० खलाशी बेपत्ता झाले आहेत. कोस्ट गार्डच्या मदतीनं या सर्व खलाशांचा समुद्रात शोध सुरू आहे. डहाणू इथल्या रामप्रसाद बोटमध्ये समुद्रात ४०- ते ४५ मैलांवर १० खलाशी मच्छीमारी करण्यासाठी गेले. मात्र हे सर्व खलाशी बूडत असल्याचं कळताच १० खलाशी प्रेमप्रसाई बोटीनं या सर्वांना वाचवण्यासाठी निघाले. त्यांनी यशस्वीरीत्या बुडत असलेल्या सर्वांना वाचवले. 

मात्र माघारी येत असलेल्या या सर्व २० खलाशांचा संपर्क तुटला. डहाणू कोस्टगार्डच्या मदतीनं दमण विमानतळाच्या माध्यमातून डॉनियर विमान यांच्या शोधासाठी निघाले आहे. मात्र अजूनही प्रेमसाई बोटीचा तपास लागलेला नाही. मुंबई कोस्टगार्डचे जहाजची आता प्रेमसाई बोटचा शोध घेत आहे. या दोनही बोट नवाबंदर गुजरातमधल्या आहेत.