ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादायक पाऊल

ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी  2  विवाहित तरुणींनी केली आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. 

Updated: Sep 1, 2023, 11:56 PM IST
ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी घडल्या 2 भयानक घटना; विवाहित तरुणींनी उचलले धक्कादायक  पाऊल  title=

Thane And Dombivli Crime News : ठाणे आणि डोंबिवलीत एकाच दिवशी दोन भयानक घटना घडल्या आहेत. दोन विवाहित तरुणींनी आत्महत्या केली आहे. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून ठाण्यातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल उचलले. चिमुकलीसह 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. डोंबिवलीत विवाहितेने  चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.  

ठाण्यात विवाहितेची चिमुकलिसह 6 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

नवरा आणि त्याच्या नातेवाईकांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून ठाण्यातील एका तरुणीने आपल्या लहानगी सह जीवनयात्रा संपवली आहे. ठाण्यासारख्या सुशिक्षितांच्या शहरात घडल्याने एकच हळहळ व्यक्त होताना दिसतेय. प्रियांका मोहिते अस या विवाहित तरुणीच नाव असून ती नवऱ्या सोबत घोडबंदर रोड कासारवडावली इथल्या जॉय स्केअर सोसायटीत रहात होती. गुरुवारी पती सोबत आणि सासरच्या व्यक्तींसोबत तिचा वाद झाल्यानंतर तिने व्हाट्सप वर स्टेटस ठेऊन आपण होणाऱ्या छळाला आता कंटाळलो असून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.यासाठी आपला पती,सासू आणि नणंद यांना जबाबदार धरून त्यांना शिक्षा व्हावी असेही तिने स्टेटस मध्ये लिहिले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री सव्वा च्या सुमारास 6व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून आपल्या अवघ्या एक वर्षे वयाच्या लेकिसह उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी कासारवडावली पोलिसानी तिचा पती महेश मोहिते याला अटक केली असून त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रियंकाच्या नातेवाईकांनी केली आहे.

डोंबिवलीत चौथ्या मजल्यावरून उडी मारून 20 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

डोंबिवलीतील पूर्वेतील आजदेपाडा मधील जयगुरुदेव इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका 20 वर्षीय महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पूजा करण सोळंके वय वर्षे 20 असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून राहणारी भिलवडी मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे.  ती तिच्या पतीसोबत डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा येथील नंदेच्या घरी रक्षाबंधनासाठी आली होती. नवरा बायकोचे किरकोळ वाद झाल्याने पूजाने टोकाचे पाऊल उचलले आणि चार मजली इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली. रामनगर पोलिसांनी आत्म्यहत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.