ठाणेः 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घरी आलेल्या नातेवाईकाचे कृत्य, कारण...

Thane News Today: ठाण्यातून एका 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 27, 2023, 04:10 PM IST
ठाणेः 18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घरी आलेल्या नातेवाईकाचे कृत्य, कारण...  title=
18 old month baby kidnapped from his home by relative in Thane

Thane News Today: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. 18 महिन्यांच्या बाळाचे घरातूनच अपहरण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे बाळाच्या मावशीच्या नवऱ्यानेच हे कृत्य केले आहे. या घटनेमुळं कुटुंबीय हादरले आहे.

18 महिन्यांच्या बाळाचे अपहरण

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या बहिणीच्या पतीनेच बाळाचे अपहरण केले होते. शुकवारी ही घटना घडली होती. महिलेच्या बहिणीचे आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणांवरुन वाद सुरू होते. त्यामुळं ती वेगळी राहत होती. अलीकडेच अलीने तक्रारदार महिलेशी संपर्क साधत त्याच्या पत्नीबद्दल विचारपूस केली होती. त्याची पत्नी कुठे राहते याची माहिती त्याला जाणून घ्यायची होती. मात्र, महिलेने आपल्या बहिणीबद्दल माहिती देण्यास नकार दिली. त्यानंतर अली तिच्याघरातून बाहेर निघून आला. 

बदला घेण्यासाठी अपहरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली बुधवारी अन्य एका व्यक्तीसोबत महिलेच्या घरी आला. तेव्हा त्याने बदला घेण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण केले. बहिणीसोबत असलेले वाद मिटवण्यासाठी मुलाचे अपहरण केले असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

आरोपी अद्याप फरार

कळवा पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बाळाच्या आईच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

भंडाऱ्यात 14 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

भंडाऱ्यातील अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे घडली. अदिक अतुल शहारे असे या मृत बाळाचे नाव आहे. वडील अतुल शहारे हा बाहेर जात असताना काही वेळाकरता अद्विकला शेजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं होतं. पण अद्विक शेजाऱ्यांच्या घरून आपल्या घरी परत आला होता. काही वेळातच अतुल परत आला तेव्हा त्याने अद्विक कुठे आहे अशी विचारणा शेजाऱ्यांकडे केली. तो कुठेही सापडत नसल्याने सर्वांनीच त्याचा शोध सुरु केला. मात्र अद्विकचा कुठेच शोध लागला आहे. बराच वेळ शोध घेतला तरी अद्विक सापडत नव्हता. शेवटी घराच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी काढत असताना अद्विक त्यात तरंगताना आढळला.