अलिबाग : Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शाळेतील 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शाळा प्रशासन हादरले आहे. (17 corona positive in a school in Mahad in Raigad district)
महाड तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली, अशी माहमती तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी दिली. दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अन्य कोणतीही लक्षणे नाहीत. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण