राज्यात आज कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

Updated: Apr 22, 2020, 06:41 PM IST
राज्यात आज कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज title=

मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२२ जणांना घरी सोडण्यात आले असून यामध्ये पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून महिलांची संख्या २८१ आहे. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या मुंबईचीच आहे. आतापर्यंत ३७४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरातील १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

राज्यातील कोरोना मुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि बरे झालेल्यांची संख्या: 
शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची जिल्हा- मनपा निहाय संख्या

अहमदनगर मनपा- ५, अहमदनगर ग्रामीण-११, औरंगाबाद मनपा- १४, बुलढाणा- ८, गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली मनपा- ३१, कोल्हापूर मनपा-२, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा- ५, मुंबई मनपा- ३७४, नागपूर मनपा- १२, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई मनपा- १९, उस्मानाबाद- ३, पालघर ग्रामीण-१, पनवेल मनपा- १३, पिंपरी-चिंचवड मनपा- १२, पुणे मनपा- १२०, पुणे ग्रामीण- ५, रायगड ग्रामीण-३, रत्नागिरी-१, सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-१, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण-  ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार मनपा- १२, यवतमाळ-७