राज्यात आज कोरोनाचे तब्बल १२१६ रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

Updated: May 7, 2020, 10:43 PM IST
राज्यात आज कोरोनाचे तब्बल १२१६ रुग्ण वाढले title=

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या आता १७ हजार ९७४ वर पोहोचली आहे. आज राज्यात १२१६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७ हजार ९७४ वर पोहोचली आहे. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

रुग्णांची संख्या आणि मृत्यू 

मुंबई महानगरपालिका: ११,३९४ (४३७)
ठाणे: ९३ (२) 
ठाणे मनपा: ६५० (८)
नवी मुंबई मनपा: ६५९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)
उल्हासनगर मनपा: १४
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १८७ (९)
रायगड: ७६ (१)
पनवेल मनपा: १२५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)
नाशिक: ४७
नाशिक मनपा: ५४
मालेगाव मनपा:  ४३२ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ६४ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)
पुणे: १०५ (४)
पुणे मनपा: १८९९ (१२२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)
सोलापूर: ६ 
सोलापूर मनपा: १७७ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)
कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)
लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण: ६१ (३)
अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ९० (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९३
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २९० (२१)
नागपूर: २
नागपूर मनपा: २०४ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २१२ (२)
इतर राज्ये: ३४ (८)
एकूण:  १७ हजार ९७४ (६९४)