11th Admission : CET देणाऱ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग अधिक सोयीस्कर

राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने सीईटी घेतली जाणार आहे. 

Updated: Aug 7, 2021, 11:50 AM IST
11th Admission : CET देणाऱ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग अधिक सोयीस्कर title=

मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेशासाठाही CET पात्र  विद्यार्थ्यांना प्रधान्य मिळणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅडमिशसाठी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

CET न देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लांबण्याची शक्यता 

राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने सीईटी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सीईटी ऐच्छिक असली तरी अकरावीच्या प्रवेशांत सीईटी  दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अकरावी प्रवेशाचा मार्ग सोयीस्कर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावीच्या प्रवेशाच्या वेळापत्रकात राखीव जागांचा तपशील दिला असला, तरी या जागांवर सीईटी दिलेल्या  आणि सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचे धोरण स्पष्ट केले नसल्यामुळे पालक व विद्यार्थाकडून याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.