आताची सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती जप्त

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांनंतर शिवसेनेचे आमदार ईडीच्या रडारवर

Updated: Mar 25, 2022, 01:07 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती जप्त title=

मुंबई : शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (ShivSena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 11.3५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडी (ED) तपास करत होती. या प्रकरणात ईडीकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्याचाही ईडीने प्रयत्न केला होता. त्यांना अनेक समन्सही पाठवण्यात आले होते. 

याच प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक यांची ठाण्यातील ११.३५ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. 

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 

त्यानंतर आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. प्रताप सरनाईक यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत 2 फ्लॅट आणि जमिनींचा समावेश आहे.  

काय आहे घोटाळा?
NSEL घोटाळा प्रकरणात संचालकांसाह 25 जणांविरोधात मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरु होती. 2013 मध्ये याप्रकरण आर्थिक गुन्हे शाखेळे FIR दाखल केला होता. त्यानतंर ईडी हा तपास आपल्या ताब्यात घेत चौकशी सुरु केली. या घोटाळ्यातील गुंतवणूकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेटमध्ये वापरल्याचं समोर आलं होतं. तब्बल १३ हजार गुंतवणूकदारांच्या ५६०० कोटींच्या रकमेचा घोटाळा असल्याचा आरोप आहे.