दहावी, बारावीचा निकाल संदर्भात आताची मोठी बातमी

10th and 12th Results : दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता आहे.  

Updated: Mar 28, 2022, 09:06 AM IST
दहावी, बारावीचा निकाल संदर्भात आताची मोठी बातमी  title=
संग्रहित छाया

पुणे : 10th and 12th Results : दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे.

आताच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे.