मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला

मुंबई - गोवा महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभीर झाला.  

Updated: May 14, 2019, 11:31 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला title=
संग्रहित छाया

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभीर झाला. मुंबई गोवा महामार्गावर महाडनजीक टोळ गावच्या हद्दीत आज दुपारी दोन भरधाव ट्रकची समोरासमोर ठोकर होऊन अपघात झाला. यात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या चालकावर महाडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रक बाजूला करण्यात आले.  दरम्यानच्या काळात वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, अलिबाग रोहा मार्गावर खानाव वेलवली येथे घरगुती गॅस वाहून नेणारा टँकर उलटून अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकरमधील गॅस बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या काळात या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच या परिसरात घरगुती गॅस वापर थांबवण्यात आला होता.