तुम्ही वापरताय ती टुथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज? असं ओळखा तुमच्या पेस्टमधील साहित्य

Toothpaste Veg Or Non Veg: तुम्ही दररोज वापरत असलेली टुथपेस्ट व्हेज आहे की नॉनव्हेज, असं ओळखा 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 23, 2024, 09:59 AM IST
तुम्ही वापरताय ती टुथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज? असं ओळखा तुमच्या पेस्टमधील साहित्य title=
your toothpaste really non veg or veg How to identify check

Toothpaste Veg Or Non Veg: दिवसाची सुरुवात ही कोणत्या गोष्टीने होत असेल तर ती म्हणजे टुथपेस्ट. टुथपेस्ट हे आपल्या रोजच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. पण तुम्हाला टुथपेस्टचा इतिहास माहितीये का? तसंच, तुमच्या टुथपेस्टमध्ये कोणते घटक आहेत? हे जाणून घेऊया. 

मिस्त्रमध्ये साधारण पाच हजार वर्षांपूर्वी दात साफ करण्यासाठी एका पेस्टचा वापर करण्यास सुरुवात झाली. पण तेव्हा याला टुथपेस्ट असं नाव देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर युनानी आणि रोमन संस्कृतीत अशा पद्धतीच्या पेस्टचा वापर सुरू झाला. भारत आणि चीनमध्ये पहिल्यांचा 500 ईसवीसन पूर्वकाळाच्या आसपास टुथपेस्टचा वापर सुरू झाला. पण आत्ताच्या आधुनिक टुथपेस्टमध्ये अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर होतो. जे आपल्या दातांची देखभाल करतात. यात ऐब्रसिव्स फ्लोराइड्स, डिटर्जेंट्स आणि ह्युमेक्टेंटस आपल्या दातात साचलेले प्लाक आणि घाण हटवण्यास मदत करतात. फ्लोराइड दातांचे इनॅमल मजबूत करतात आणि कॅव्हिटी रोखण्यास मदत करते. तर, डिटर्जेंट टुथपेस्टमध्ये फेस आणण्याचे काम करतात.

आजकाल टुथपेस्टमध्ये फ्लेवरिंग एजेंट, अँटीबॅक्टेरियल एजेंट आणि प्राकृतिक तत्वदेखील मिसळले जातता. जसं की, बेकिंग सोडा, हर्बल अर्क जे दातांच्या सफाईसाठी सहाय्यक असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक मोठा वाद रंगला आहे. टुथपेस्टमध्ये नॉनव्हेज साहित्यदेखील मिसळले जाते. डेन्टिस्टने दिलेल्या माहितीनुसार, दातांना कॅव्हिटीपासून वाचवण्यासाठी नॉनव्हेज इंग्रीडिएंटची गरज नसते. टुथपेस्टमध्ये फ्लोराइड, ऐब्रसिव्स (कॅल्शियम कार्बोनेट व सिलिका) आणि ह्यूमेक्टेंट्स (ग्लिसरीन) सारखे साहित्य पुरेसे असतात. फ्लोराइड दातांचे इनॅमल मजबूत करतात आणि कॅव्हिटी रोखण्यास मदत करतात. जसं की अॅब्रसिव्स आणि ह्यूमेक्टेंट्स प्लाक आणि घाण हटवण्यास मदत करतात. 

टुथपेस्टमध्ये नॉनव्हेज साम्रगी आहे की नाही कसं ओळखाल?

भारतात शाकाहारी आणि मासांहरी अशा दोन्ही प्रकारची लोक आढळतात. त्यामुळं भारतीयांना हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. टुथपेस्ट व्हेज आहे की नॉन व्हेजिटेरियन. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने यासंबंधी काही नियम स्पष्ट केले आहेत. तसंच, काही नियमही सांगितले आहेत. तुमची टुथपेस्ट व्हेज आहे की नॉनव्हेज हे कसं ओळखालं. 

पॅकेजिंगवरील निशाण ओळखा?

FSSAIच्या नियमांनुसार, सर्व खाद्य आणि व्यक्तिगत उत्पादनांवर एक स्पष्ट सूचना व लेबल असणं आवश्यक आहे. टुथपेस्टसाठी हे लक्षात ठेवा. 

हिरवा बिंदूः हे उत्पादन व्हेजिटेरियन असल्याचे संकेत
लाल त्रिकोणः हे उत्पादन नॉन व्हेजिटिरेयन असल्याचे संकेत 

टुथपेस्टमध्ये असलेली सामग्री वाचा

ग्लीसरीनः जर जनावरांच्या चरबीचा वापर केला असेल
कॅल्शियम फॉस्फेटः हाडांचा वापर करण्यात येतो
काही एंजाइम्सः जनावरांच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आलेले