करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई

अभिनेता करीना कपूरने जेव्हा सैफशी लग्न केलं तेव्हा ती सावत्र आई म्हणून कशी असेल अशी चर्चा रंगली होती. याबाबत अनेकांच्या नकारात्मक कमेंट्सपण होत्या. पण करीनाच्या 'या' 5 गुणांमुळे ती वेगळी ठरते. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 22, 2024, 12:03 PM IST
करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई title=

'सावत्र आई' हा शब्दच मुळात एक नकारात्मक विचार आणि भावना घेऊन येतो. पण या शब्दाचा उच्चार केला तर नजरेसमोर येते एक चेटकीन किंवा विचित्र बाई. पण या सगळ्या गोष्टी अभिनेत्री करीना कपूरने खोट्या ठरवल्या आहेत. करीना कपूर 5 गोष्टींमुळे एक सर्वोत्कृष्ठ सावई आई ठरती. 

सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. जेव्हा बेबो आणि सैफने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही मुले त्या वयात होती जेव्हा त्यांना नातेसंबंध चांगल्या प्रकारे समजत होती. अशा स्थितीत करीना आणि सैफच्या मुलांचं अजिबात जमणार नाहीत, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण नेमके उलटं घडलं त्यामुळेच सैफची दुसरी पत्नी म्हणजे करीना कपूर बेस्ट स्टेप मॉम असल्याचं अधोरेखित झालं आहे. त्याला कारणं आहेत करीना कपूरते 5 गुणं.

अमृताचं कौतुक करणे 

 सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने साराची भेट घेतली होती. यादरम्यान तिने पतौडी कुटुंबातील पहिली सून म्हणजेच अमृता सिंगचे कौतुक केले होते. एवढंच नव्हे तर अमृता सर्वोत्तम आई असल्याचही सांगितलं. करीना कपूरसाठी हे बोलणं खरंच खूप मोठी गोष्ट होती. याचे कारण असे की, दुसरी पत्नी पहिल्या पत्नीबद्दल मत्सर बाळगून असते. पण बेबोने असे न करता एक चांगला आदर्श जगासमोर ठेवला आहे.  

आईची जागा न घेणे 

करीनाने अमृताचं कौतुक केलं. ती एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने कधीच अमृताची जागा घेण्याचा प्रय्तन केला नाही. करीनाने अमृता आणि तिच्या मुलांशी मैत्री केली. यामुळे करीना आणि त्यांच्यातील नातं अतिशय चांगल झालं. तिने कधीच अमृता किंवा तिच्या मुलांचा अपमान केला नाही. करीनाने कायमच अमृता आणि सैफ यांचं नातं देखील स्वीकारलं. 

वडिलांपासून केलं दूर 

करीनाने लग्न केल्यावर सैफला कधीच पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांना वेगळं केलं नाही. सैफ कायमच सारा आणि इब्राहिमसोबत दिसला. यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं. करीना देखील आपल्या मुलांना घेऊन यांच्यासोबत वेळ घालवताना दिसली. सैफची चारही मुलं अनेकदा एकत्र वावरताना दिसतात. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x