आई-वडिलांपासून एक मिनिटंही दूर राहत नाही मुलं, त्यांच्या सततच्या रडण्याने हैराण झालात?

Parenting Tips in Marathi : अनेक लहान मुलांना पालकांपासून दूर राहण्याची एंग्जायटी असते. ज्याला सेपरेशन एंग्जायटी (Separation Anxiety Disorder) म्हणतात.  अशा परिस्थितीत पालकांनी काय करावे आणि मुलांना कसे हाताळावे?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 6, 2023, 06:41 PM IST
आई-वडिलांपासून एक मिनिटंही दूर राहत नाही मुलं, त्यांच्या सततच्या रडण्याने हैराण झालात? title=

Separation Anxiety Disorder in Children : लहान मुलं क्वचितच आई-वडील आणि घरापासून दूर राहतात आणि त्यांना जिथे जायची संधी मिळते तिथे ते आई-वडिलांसोबत जातात, पण जेव्हा मुलाची शाळेत जाण्याची वेळ येते, तेव्हा इथे त्याला पालकांशिवाय राहावं लागतं. अशा परिस्थितीत, मुलाला वेगळे होण्याची चिंता लागू शकते. आई-वडील ऑफिसला गेल्यावर मुलंही रडायला लागतात. यामध्ये मुलाला आई-वडिलांपासून दूर जाण्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्याला चिंता वाटू लागते. अशा परिस्थितीत पालकांनी काय करावे आणि मुलांना कसे हाताळावे?

हळू हळू तयार होतात 

UNICEF.org नुसार, सुरुवातीला तुम्ही मुलाला सतत कित्येक तास एकटे सोडू नये, तर त्याला हळूहळू तयार करावे. तुम्ही त्याला सतत नऊ तास ऑफिससाठी किंवा सतत 4 ते 5 तास शाळेसाठी एकटे सोडू नका, तर हळूहळू त्याला तुमच्यापासून दूर राहण्यासाठी तयार करा. जर तुम्ही काही काळासाठी बाजारात जात असाल तर मुलाला सांगा की, तुम्ही काही वेळात परत याल.

परत येताना वेळ घालवू

जेव्हा पालक मुलांपासून दूर जातात तेव्हा मुलाला भीती वाटते की, ते आपल्याला पुन्हा भेटू शकणार नाही. पालक दूर गेल्यावर आपल्याला पुन्हा भेटू शकणार नाही असे त्याला वाटते. अशा परिस्थितीत, मुलाला सांगावे की, आपण काही वेळाने परत याल आणि त्याच्याबरोबर बराच वेळ घालवाल किंवा खेळू. यामुळे मूल न रडता तुमची वाट बघेल.

निरोप देताना वेळ काढू नका

काही पालक आपल्या मुलाचा निरोप घेताना थोडा वेळ घेतात. मुल निघून जात असताना रडत असेल तर पालक त्याच्या जवळ बसतात आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलापासून दूर जात असाल, तेव्हा निरोप घेण्यास जास्त वेळ घेऊ नका. हसा आणि आपण लवकरच येतोय असं सांगून निघून जा. दररोज अशा प्रकारे निरोप घेतल्याने, तुमचे मूल विश्वास ठेवेल की तुम्ही त्याच्याकडे परत याल.

आल्यावर काय करावे

Healthychildren.org नुसार, मुलापासून दूर जाण्यापूर्वी आणि परतल्यानंतर, त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे आणि त्याचे खूप लाड केले पाहिजे. याशिवाय तुम्ही किती वाजता परतणार आहात हे तुम्ही तुमच्या मुलाला सांगावे. यामुळे, तुमच्या मुलाची चिंता कमी होईल आणि तो शांत राहील आणि तुमची वाट पाहील.

विभक्त होण्याची चिंता किती काळ टिकते?

प्रत्येक मुलासाठी विभक्त होण्याच्या चिंतेचा कालावधी भिन्न असतो आणि तो मुलाच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतो. काही प्रकरणांमध्ये, हे मुलाच्या रागावर देखील अवलंबून असते की त्याला किती काळ वेगळे होण्याची चिंता असेल आणि तो तुमच्याशिवाय कधी राहू शकेल.