Valentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का? 

नेहा चौधरी | Updated: Feb 13, 2024, 12:43 PM IST
Valentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का? title=
Valentine Day Special The day of love celebrated in ancient times Do you know Madnotsav and rati kamadeva love story

Madanotsav Vs Valentine : जगभरात 14 फेब्रुवारीला प्रेमी युगुल प्रेमाचा दिवस साजरा करतात. 14 फेब्रुवारीला Valentine's Day 2024 साजरा करण्यात येतो. भारतात प्राचीन काळापासून प्रेम दिवस साजरा करण्यात येतो आहे. कधी साजरा करायचा प्रेमाचा दिवस आणि तो कोणाच्या प्रेमाला समर्पित होता तुम्हाला माहिती आहे का? हिवाळा संपला की वसंत ऋतूला सुरुवात झाली की मदनोत्सव साजरा करण्याची परंपरा अतिशय जुनी होती. सनानत संस्कृतीत प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी मदनोत्सव साजरा करण्यात यायचा. या मदनोत्सवाबद्दल धर्मग्रंथांमध्ये प्रेम हे सहज, सोप्या आणि समर्पित स्वरुपात मांडण्यात आलंय. (Valentine s Day Special The day of love celebrated in ancient times Do you know Madnotsav and rati kamadeva love story)

मदनोत्सव म्हणजे काय?

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीपासून म्हणजे बसंत पंचमीपासून बसंतोत्सव किंवा मदनोत्सल साजरा करण्यात यायचा. हा सण कामदेव आणि रती यांच्या प्रेमाला समर्पित केला गेला आहे. कालिदासांनी 'ऋतु ​​संहार'मध्ये मदनोत्सवाबद्दल बरच लिखाण केलंय. कामशास्त्रात 'सुसंतक' आणि 'मदनोत्सव' याविषयी बरंच लिहिलं गेलंय आणि चर्चा करण्यात आली आहे. 

प्राचीन काळात वसंत ऋतूनिमित्त महिनाभर मदनोत्सव साजरा करण्यात येत होता. हळूहळू हा मदनोत्सवाचा सण नाहीसा झाला. पण 'ऋतु संहार' मध्ये या सणाबद्दल वर्णन करताना असं म्हटलंय की, सुंदरी आपले उबदार कपडे काढून लाल रंगाची चादर अंगावर घेते. तिने हळदीची पिवळी साडी परिधान केली असते. तर 'दशकुमारचरिता' मध्येही या सणाला काम महोत्सवाशी जोडल आहे. वसंत ऋतू येताच वातावरणात बहार येते म्हणून मदनोत्सव, कौमुदी महोत्सव किंवा बसंतोत्सव साजरा करण्यात येत होता.

चार्वाक प्रेमोत्सव!

व्हॅलेंटाईन डेला भारतात विरोध होताना आपण कायम पाहतो. पण भारतीय संस्कृतीत भारतीय ऋषी चार्वाक यांनी प्रेमाचा दिवस साजरा करण्यास सुरु केली होती. 2700 वर्षांपूर्वी चार्वाक प्रेमोत्सव किंवा प्रेमाचा चंद्र उत्सव साजरा केला जात होता. तोच उत्सव म्हणजे मदनोत्सव होता. 

हा प्रणय उत्सव म्हणजेच प्रेम आणि आनंदाचा उत्सव असायचा. रात्रभर तरुण-तरुणी एकत्र नाचून एकमेकांना भुरळ घालायची. चार्वाक हे म्हणायचे की आपण जीवनातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घ्याला हवा. म्हणूनच त्यांना आर्ट ऑफ जॉयफुल लिव्हिंगचे जनक असंही म्हटलं जातं. 

चारुदत्त या संस्कृत नाटकात कामदेवसदृश्य उत्सवाचा उल्लेख करण्यात आला आहे. या उत्सवात कामदेवाची मिरवणूक काढली जायची. मृच्छकटिकम् या नाटकात या मिरवणूकचं रुप दाखविण्यात आलंय. त्यात दाखवलं आहे की, कामदेवाची मिरवणुकीत बसंत सेना सहभागी व्हायची. तर भविष्य पुराणात असं सांगितलं आहे की, बसंत ऋतूमध्ये कामदेव आणि रती यांच्या मूर्तींची स्थापना करून भक्तीभावे पूजा केली जाते. विशेष म्हणजे हा मदनोत्सव रंगपंचमीपर्यंत (Holi 2024) साजरा करण्यात यायचा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)