Sankashti Chaturthi 2024 : दरवर्षी 12 संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. 2024 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे 'लंबोदर संकष्ट चतुर्थी' आहे. यावर्षी सकट चौथ 29 जानेवारी 2024 रोजी आहे. सकट चौथच्या दिवशी लहान मुलांच्या सुख, प्रगती आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा देऊन श्रीगणेशाची पूजा केली जाते.
गणपतीच्या अनेक भक्तांना आपल्या मुलांची नावे बाप्पाच्या नावावरुन ठेवायची असतात. अशावेळी तुम्हाला ही पुढील नावे जी युनिक आणि मॉर्डन पद्धतीची आहेत त्याचा नक्की विचार करु शकता.
गौरिक- गौरिक हे नावही खूप खास आणि वेगळे आहे. फार कमी लोक त्यांच्या मुलाचे नाव ठेवतात. जर तुम्हाला काही वेगळे नाव ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव गौरिक ठेवू शकता.
अमेय- हे नावही खूप वेगळे आहे. अमेय म्हणजे ज्याला मर्यादा नाही. जर तुमच्या घरी मुलगा झाला आणि त्याचे नाव तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही त्याचे नाव अमेय ठेवू शकता.
अनव : ज्यामध्ये माणुसकी भरलेली असते त्याला अणव म्हणतात. अनव या नावाचा अर्थ दयाळू असाही होतो. अमेय नावाचे लोक शांत जीवन जगतात.
अन्मय : जो प्रतिकूल परिस्थितीतही अशक्त होत नाही आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतो त्याला अनमय म्हणतात. हे मुलासाठी खूप सुंदर आणि अर्थपूर्ण नाव आहे. अनमय नावाचा अर्थ असा आहे की ज्याला तोडता येत नाही.
अथर्व: या हिंदू नावाचा अर्थ ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. ज्याला भरपूर ज्ञान असते त्याला अथर्व म्हणतात. अथर्ववेद हा देखील चार वेदांपैकी एक आहे.
अश्रित : आश्रय आणि संरक्षण देणाऱ्याला अश्रित म्हणतात. गणपतीला या नावानेही ओळखले जाते. तीन अक्षरी अशा या नावाचा नक्की विचार करु शकता.
श्रेय- आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरात तुमच्या मुलाचा जन्म झाला असेल तर ती खूप शुभ गोष्ट आहे. जर तुम्ही गणेशाचे भक्त असाल आणि त्याची नियमित पूजा करत असाल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'श्रेय' ठेवू शकता. श्रेय म्हणजे सुंदर, भाग्यवान आणि शुभ.
मयंक- बहुतेकांना हे नाव आपल्या मुलासाठी ठेवायला आवडते. मयंक नावाचा अर्थ शुद्ध, शुभ, भाग्यवान, प्रामाणिक. तुमचा मुलगा आयुष्यात प्रामाणिक असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला हे नाव देऊ शकता.