भारतीय संस्करृतीमध्ये नामकरण सोहळा हा परंपरेने वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. असं म्हटलं जातं की, मुलावर पहिला संस्कार होतो तो नामकरणाचा. त्याला दिलेल्या नावामुळे त्याच्यावर संस्कार घडत असतो. नाव हे केवळ ओळखीचे साधन नाही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि भाग्यात प्रभाव पडतो. याकरिता पालक मुलांसाठी नाव निवडताना अतिशय विचार करतात. हे नाव खूप मिनिंगफुल आणि भाग्यशाली असणं गरजेचं असतं.
लोकं पुन्हा एकदा आपल्या सभ्यता आणि संस्कृतीला महत्त्व देऊ लागले आहेत. अनेक पालक आपल्या मुलांसाठी संस्कृत प्रेरित नावे निवडतात. संस्कृत भाषा ही भारतातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. ही भाषा तिच्या समृद्ध शब्दसंग्रह आणि व्याकरणासाठी ओळखली जाते. या भाषेत अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण नावे आहेत. जी मुलींसाठी आधुनिक नावांपेक्षा कमी नाहीत.