How To Keep Food Warm: शाळेत मुलांना, पती-पत्नी दोघेही ऑफिसला जाताना टिफिन घेऊन जातात. इतकंच काय तर लांबच्या प्रवासाला जातानाही प्रवासात खाण्यासाठी डब्बा भरुन नेतात. मात्र, बराचवेळी डबा असाच ठेवल्याने तो थंड होतो. त्यामुळं थंड झालेले अन्न खाणे प्रत्येकालाच आवडेल असं नाही. लहान मुलांनाही थंड अन्न फारसे आवडत नाही. त्यामुळं ते कित्येकदा डबा अर्धा परत आणतात. ज्यांना रोज गरम जेवणाची सवय असते. एकवेळ ऑफिसमध्ये ते डबा गरम करु शकतात. मात्, शाळेतील मुलांकडे तो पर्याय नसतो. त्यामुळं डब्यातील अन्न दीर्घकाळ गरम राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
मुलांनी त्यांचा डबा रोज संपवावा म्हणून प्रत्येक आई रोज वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कधी कधी वेगळा पदार्थ बनवून देतात कधी त्यांच्या आवडीचे पदार्थ डब्यात देतात. मात्र, मुलांनाही रोज रोज डब्यातील थंड जेवण खाणे आवडत नाही. त्यामुळं मुलांना अगदीच गरमा-गरम तर नाही पण थोडे फार गरम जेवण तर मिळू शकते. यासाठी तुम्हाला या चार टिप्स मदत करु शकतात.
सकाळी भरलेल्या डब्यातील जेवण दुपारपर्यंत गरम ठेवण्यासाठी तुम्ही इन्सुलेटेड कंटेनरचा वापर करु शकता. यात जेवण तर गरम राहिलच पण फ्रेशदेखील राहिल. फक्त डबा पॅक करताना एक लक्षात घ्या की, ती उष्णता तुम्ही सील करुन ठेवा. त्यामुळं तुम्हाला गरमा गरम खाण्याचा आनंद मिळेल. जसा तुम्ही घरी जेवण जेवता.
उकळत्या पाण्याचा वापर करुन अन्न गरम ठेवता येते. हेऐकून तुम्हालाही थोडे विचित्र वाटलं ना पण हे खरं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये पाणी गरम करुन घ्या. पाणी उकळल्यानंतर ते स्टीलचा डबा ठेवून द्या आणि गॅस बंद करा. जो पर्यंत तुमचे जेवण तयार होतंय तोपर्यंत डबा उष्णता शोषून घेईल. आता जेवण पॅक करताना डब्यातील पाणी फेकून द्या आणि डबा चांगला सुकवून घ्या. डब्यात जेवण पॅक केल्याने दीर्घकाळापर्यंत गरम राहिल.
हल्ली अॅल्युमियियन फॉइलचा सर्रास वापर होताना दिसतोय. जेवण दीर्घकाळापर्यंत गरम ठेवण्यासाठी थर्मल बॅरिअर म्हणून अॅल्युमिनियम फॉइलचा उपयोग करु शकता. जेवण पॅक करताना अॅल्युमिनियम फॉइल एकदम घट्ट गुंडाळा आणि आतल्या बाजुने मोडून घ्या. जेणेकरु जेवण दीर्घकाळापर्यंत गरम राहिल. मात्र, हा उपाय इन्सुलेटेड कंटेनर इतका प्रभावी नसला तरी थोड्याफार प्रमाणात जेवण गरम आणि ताजे राहिलं.