सुयश टिळकने सर्वांसमोर मांडली पालकांची 'ही' चूक, कार्टून दाखवताना काय काळजी घ्याल?

अभिनेता सुयश टिळकने पालकांची एक मोठी चूक व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे. प्रत्येक पालकाने पाहावा असा व्हिडिओ. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 9, 2024, 07:00 PM IST
सुयश टिळकने सर्वांसमोर मांडली पालकांची 'ही' चूक, कार्टून दाखवताना काय काळजी घ्याल? title=

अभिनेता सुयश टिळकने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या पोस्टमध्ये त्याने आपला हॉटेलमधील अनुभव सांगितला आहे. पालक मुलांना शांत बसवण्यासाठी हातात मोबाईल देतात. पण आपलं मुलं मोबाईलवर काय पाहत आहे याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेची असते. कारण मुलांवर या सगळ्याच्या माध्यमातून संस्कार घडत असतात. पालकांनी घ्यावी विशेष काळजी. 

सुयश टिळकचा अनुभव 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

सुयश टिळकने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, हॉटेलमध्ये त्याच्या बाजूच्या टेबलवर एक फॅमिली जेवायला बसली होती. ज्यामध्ये तीन वर्षांची मुलगी होती. जी मुलगी कार्टून बघत होती. या व्हिडीओमध्ये सुयश टिळकने कार्टूनमधील संवाद बोलून दाखवले आहेत. यामध्ये मुलगी जे काही पाहत आहे ते चुकीचं असल्याचं दिसून येतं.  पालकांनी मुलं आपली स्क्रिन टाईम किती वेळ पाहतात? यासोबतच काय पाहतात त्याची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. 

मुलं काय पाहतात 

पालकांनी मुलं स्क्रिन टाईममध्ये काय पाहतात याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुलं काय पाहतात याकडे पालकांनी लक्ष द्यावं. कारण मुलं जे पाहतात त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल होत असल्याचा अनुभव अनेक पालकांचा आहे. त्यामुळे पालकांनी कार्टूनमध्ये देखील काही गोष्टी ठरवून द्याव्यात. मुलांनी पालकांनी सांगितलेल्या गोष्टीच पाहाव्यात 

मुलांशी संवाद साधायचा 

 पालकांनी मुलांशी संवाद साधावा. मुलं काय बघतात? त्यांच्याकडून मुलं काय शिकतात याचा देखील पालकांनी अंदाज घ्यावा. मुलांशी टीव्ही पाहण्यावर संवाद महत्त्वाचा आहे. मुलांशी त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणून कार्टूनवर संवाद साधलात. तर तुम्हाला मुलं या सगळ्याबाबत काय विचार करतात याचा देखील अंदाज येतो. 

कार्टूनमधूनही शिकतात मुलं 

यूट्यूुबवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलांमध्ये क्रिएटिविटी वाढवतात. तसेच आताची मुलं एक सिंगल चाईल्ड असतात. या मुलांमध्ये शेअरिंगची भावना निर्माण करण्यासाठी व्हिडीओ नक्कीच मदत करतात. तसेच मुलं वेगवेगळी भाषा आणि तेथील संस्कृती देखील या व्हिडीओंमधून शिकत असतात. त्यामुळे पालकांनी या गोष्टींचा विचार करावा