ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

फक्त कॉमन आवडीनिवडीच नाही, तर... ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 31, 2024, 04:00 PM IST
ऋषि सुनक आणि अक्षता मूर्तिने सांगितलं आनंदी नात्याचं गुपित title=

नातं, संसार यातील आनंदाच गुपित समजून घेत असताना अनेक कपल आपल्यासमोर आदर्श म्हणून उभे राहतात. तसेच आहे हे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती हे दाम्पत्य. या दाम्पत्याने पहिल्यांदाच आपल्या आनंदी संसाराचं गुपित उलघडलं आहे. 

नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी त्या कपलच्या खाण्याच्या सवयी आणि मित्र परिवार एक असणं गरजेचं आहे हा समजच मुळात चुकीचा आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक आणि देशाची फर्स्ट लेडी अक्षता मूर्तिने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टवर पहिल्यांदाच हॅप्पी रिलेशनशिपचे रहस्य उलघडलं आहे. त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टने अनेकांचं मन जिंकलं आहे. 

सुनक आणि मूर्ति यांनी फिरणं आणि आवडीचे पदार्थ खाणं हेच आनंदी जीवनाचं गुपित नसल्याचं सांगितलं आहे. तर तुमची मूल्य अतिशय महत्त्वाची भूमिका नात्यामध्ये बजावत असल्याचं सांगितलं आहे. या पोस्टमध्ये खासगी जीवनाबद्दल बोलताना त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळीयाबाबत उत्तर देण्यात आलं की, लोकं अनेकदा आम्हाला विचारतात की, तुमच्यात सगळ्यात जास्त कॉमन गोष्ट कोणती आहे?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishi Sunak (@rishisunakmp)

यावर उत्तर या पोस्टमधून दिलं आहे. 'आमच्या दोघांची आवड फक्त स्पॅनिश पदार्थ खाणे आणि मित्र परिवारांच्या गाठीभेटी घेणं असं नाही.' तर यासोबतच काही मूल्य आहेत जी आम्ही जीवनात तंतोतंत पाळतो. मेहनतीवर तुमचं भविष्य ठरत असतं. त्यामुळे मेहनीतवर आमचा प्रचंड विश्वास आहे. जीवनात चांगला बदल घडवून आणायचा असेल तर धाडसी बदलाची गरज आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या मुलांना आजपेक्षा सर्वोत्कृष्ठ जग भविष्यात मिळेल यात शंका नाही. पोस्टमध्ये या कपलने दोन फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ते अतिशय आनंदी दिसत आहे. लोकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अनुभव आणि विश्वास व्यक्त केला आहे. 

अक्षता-ऋषि यांची लव्हस्टोरी 

अक्षता आणि ऋषी यांची पहिली भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली. हे दोघेही एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी आले होते, याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकदा दोघांनी कॉफी शॉपच्या बाहेर बराच वेळ एकत्र घालवला होता, ज्यामध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये आले. जेव्हा अक्षताने तिचे वडील नारायण मूर्ती यांना स्वतःबद्दल आणि ऋषीबद्दल सांगितले तेव्हा ते खूप दुःखी झाले. पण ऋषींना भेटल्यानंतर त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली, नारायण मूर्ती म्हणाले की ऋषी एक हुशार, देखणा आणि प्रामाणिक मुलगा आहे आणि त्यांनी त्यांच्या नात्याला सहमती दिली.