Why Are Women Attracted To Older Men: लग्नासाठी मुलांच्या व मुलीच्या वयात अंतर असावे, असं म्हणतात. पण हल्ली मुलं वयापेक्षा मोठ्या मुलीसोबत लग्न करण्यावर जास्त भर देतात. तर, मुलीदेखील वयाने मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास अधिक पसंती देतात. पण असं का? याचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिले लग्न करण्यासाठी वयाचा मुद्दा हा देखील महत्त्वाचा असायचा. पूर्वीच्या काळी मुलीच्या वयापेक्षा मुलाचे वय खुप जास्त असायचे. मात्र, जसा काळ बदलला तसं मुली वयाच्या बरोबरीच्या मुलासोबत लग्न करायचे. काही वेळा तर वयाने लहान असलेल्या मुलांसोबतही मुली लग्नासाठी तयार होतात. मात्र, आता पुन्हा एकदा वा ट्रेंड समोर येत आहे. मुली वय जास्त असलेल्या मुलासोबत लग्न करणे जास्त पसंत करतात.
मुलींची पसंद आता बदलत चालली आहे. पण नेमका हा ट्रेंड काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी काय करु शकता याबाबतही सांगणार आहोत.
आपण ज्या मुलासोबत संपूर्ण आयुष्य व्यतित करण्याचा विचार करत आहोत किंवा ज्याला डेट करत आहोत तो मॅच्युअर असावा, असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. पण असं नाहीये की परिपक्वता वय वाढल्यानंतरच येते. मात्र, वयानुसार परिपक्वता येते हे देखील खरं आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टी समजून घेणारा पाहिजे. त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या पार्टनरसोबत भविष्याचा विचार करताय तर त्याची मॅच्युरिटी पाहा,
कोणत्याच मुलीला असा पार्टनर आवडणार नाही जो भविष्याचा गांभीर्याने विचार करत नसेल. जो आयुष्याकडे गांभीर्याने बघत नसेल आणि त्याला सतत मस्करी न मज्जा मस्ती करण्याची सवय असेल. यासाठीच मुली लग्नासाठी वयाने मोठ्या मुलाशी लग्न करणे पसंत करतात. कारण त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो. त्याचबरोबर त्यांच्यात गांभीर्याने विचार करण्याची क्षमता असते. जे प्रत्येक नात्यात गरजेचे असते.
जेव्हाही आपण एखाद्या व्यक्तीसोबत नवीन नात्यात बांधले जातो. तेव्हा आपल्या मनात पहिला विचार येतो, की माझे भविष्य त्याच्यासोबत चांगले असेल की नाही. वयाने मोठ्या मुलांसह, आपल्याला या गोष्टींबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण भविष्यात कुटुंब वाढेल आणि जबाबदाऱ्या येतील याची जाणीव त्यांना असते. तशी पुरेशी समज त्यांच्यात विकसित झालेली असते.
वय वाढत जातं तसा समजुतदार पणा व आत्मविश्वासपणा यायला लागतो. त्यामुळं मुलींना अशा मुलांसोबत अधिक सुरक्षित वाटते. जर तुमच्या पार्टनरमध्ये आत्मविश्वास असेल तर तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी करण्याची प्रेरणा देईल.
वयाने मोठ्या असलेल्या मुलांचा लग्नासाठी विचार करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा स्थिर आर्थिक स्थिती. जी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)