औषधांची खाण आहे 'हे' फळ; पण वर्षातून फक्त 2 महिनेच मिळते, पानांमध्येही आहेत औषधी गुणधर्म

Bhokar Fruit Benefits In Marathi: संपूर्ण वर्षात फक्त दोनदा हे फळ बाजारात उपलब्ध असते. पण या फळाचे फायदे वाचून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 11, 2023, 04:00 PM IST
औषधांची खाण आहे 'हे' फळ; पण वर्षातून फक्त 2 महिनेच मिळते, पानांमध्येही आहेत औषधी गुणधर्म title=
Rare fruit bhokar found just 2 months in market know the medical benefits

Bhokar Fruit Benefits: निसर्गाने मानवाला भरपूर संपत्ती देऊ केली आहे. आज जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स औषधांच्या रुपात घेतले जातात. तेच सगळे निसर्गाने फळांच्या स्वरुपात आधीपासून मानवाला दिले आहेत. जगात अशी अनेक फळ आहेत ज्यांला तुम्ही औषधांची खाण म्हणू शकतात. जगात उपलब्ध असलेल्या फळ आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला ज्या फळाची माहिती सांगणार आहोत ते फळ म्हणजे व्हिटॅमिन्सची खाण आहे. याचे गुणधर्म औषधी आहेत. 

आम्ही तुम्हाला ज्या फळाबद्दल सांगणार आहोत त्या फळाचे नाव भोकर असं आहे. या फळाचा आकार लहान सुपारी एवढा असतो. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृतमध्ये श्लेष्मातक आणि इंग्रजीमध्ये इंडियन चेरी असंही म्हणतात. भोकर हे शक्तीवर्धक फळ आहे. या फळात इतके औषधी गुण असतात की याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारांवर मात करता येऊ शकते. जाणून घेऊया या फळाच्या औषधी गुणधर्मांबाबत.

भोकर फळाचे झाड भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशियासारख्या देशात आढळले. तर, महाराष्ट्रात पश्चिमी घाट, सातपुडा कोकण या ठिकाणी जंगलात वृक्ष आढळून येतात. 10 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढणारा सदापर्णी वृक्ष आहे. वर्षातून फक्त दोन महिनेच या झाडाला फळ लागतात. जुलैच्या महिन्यात फळ लागण्यास सुरुवात होतात. सुरुवातीला ही फळ हिरवे असतात नंतर पिकण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबी किंवा तांबुस पिवळ्या रंगाची होत जातात. चवीला हे फळ गोड असते. 

भोकर या झाडाच्या प्रत्येक भागाचा महत्त्वपूर्ण उपयोग आहे. भोकरीची फळे कच्चे असताना त्याचे लोणचे बनवून खाऊ शकतात. तर काही जण त्याची पावडर करुनही ठेवतात. तर, पिकल्यानंतरही काही जणे खाणे पसंत करतात. भोकरीची फळे खाल्ल्यास कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम मिळतो. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. 

भोकरीच्या फळांची साल देखील उपयोगी आहेत. या सालांमुळं फुफ्फुसांच्या सर्व रोगांत उपयुक्त आहेत. साल सौम्य शक्तीवर्धक म्हणून उपयुक्त आहे. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्याच्या आंबीत उगाळून दिली जाते. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत.