How To Make A Mango Leaf Toran: दसरा अवघा एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने दसरा साजरा केला जातो. सरस्वती, शस्त्रे आणि घरातील वस्तूंची विधिवत पूजा केली जाते. वाहने स्वच्छ धुवून हार घालून त्यांची पूजा केली जाते. तर, घरासमोर सुबक रांगोळी व दारावर तोरण बांधून घर सजवले जाते. दसऱ्याच्या दिवशी गोंड्याची फुले म्हणजेच झेंडुच्या फुलाला अधिक मागणी असते. आज आम्ही तुम्हाला घरीच झेंडूचे तोरण कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
दसऱ्याच्या दिवशी फुलांची मागणी वाढते. त्यामुळं फुलांचा भावही वाढतो. फुलांचा हार घ्यायचा म्हटलं तर साधा हारही 100 रुपयांच्या वर विक्री केली जाते. अशावेळी तुम्ही घरातच वेगवेगळ्या डिझाइनचे व फुलांचे हार बनवू शकता. अनेकांना हार बनवणे हे जिकरीचे व वेळ खाऊ वाटू शकते. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही झटपट हार कसे बनवता येतील, हे सांगणार आहोत. तसंच, फुलांचे तोरण बाजारात घ्यायला गेले तर एक तोरण 500 रुपयांपर्यंत जातं. पण झटपट व सुबक होणारे तोरण आज आपण पाहूयात.
तुम्ही आंब्यांची पाने आणि झेंडुची पिवळ्या व लाल रंगाची फुले वापरुन तुम्ही दारासाठी तोरण बनवू शकता. एक पुठ्ठा घेऊन त्यावर गोलाकार आकारात पाने लावून घ्या. नंतर त्यावर फुलं ओवून घ्यावी. हे तोरण दारावर लावायला घ्या.
तुम्ही एका केळीच्या पानापासून दारासाठी तोरण बनवू शकता. पहिल्या केळीच्या पाने एका पानांच्या आकारात कारून घ्या. नंतर विविध फुलांचा वापर करुन त्यात ती फुलं ओवून घ्या. दारावर हे तोरण खूप छान दिसते.