How To Clean A Tea Strainer At Home: दिवसाची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. चहा नसेल तर काही जणांना चुकल्या चुकल्यासारखं वाटत. चहा हे भारतीयांचे सर्वात आवडतं पेय आहे. भारतीयांची हिच आवड लक्षात घेऊन अनेक कंपन्या विविध चहाचे फ्लेवर्सदेखील घेऊन आले आहेत. मात्र खरा चहा तो आल्याचा किंवा गवतीचा अनेकांच्या घरात चहाचे भांडे वेगळेच ठेवण्यात येते. तसंच, चहाची गाळणीदेखील वेगळी ठेवली जाते. मात्र, गाळणीचा सतत वापर होत असल्याने ती काळीकुट्ट दिसते व खराब होते. गाळणीचा सतत वापर होत असल्याचे चहाच्या गाळणीमध्ये लहान कण जमा होतात.
काळीकुट्ट झालेली चहाची गाळणी साफ करणे म्हणजे खूप कष्टाचे काम आहे. काहीजणं तर वर्षानुवर्ष या गाळण्या साफ करत नाहीत किंवा बदलत नाहीत. अशावेळी नंतर या गाळण्यांमधून चहा पिणंही कसंतरी होतं. या गाळण्या आपल्या साध्या साबणाने घासून स्वच्छ केल्या तरी त्यांचा काळपटपणा जात नाही. गाळणी स्वच्छ करण्यासाठी या एका ट्रिकचा वापर करुन पाहा.
चहाची गाळणी घासूनही स्वच्छ होत नाही अशावेळी ती काळपट पडत जाते. त्यामुळं ही एक सोप्पी ट्रिक वापरुन तुम्ही चहाची गाळणी स्वच्छ करु शकता.
- सगळ्यात आधी चहाची गाळणी गॅसवर हायफ्लेमवर ठेवा. पाच ते दहा मिनिटांनी गॅस बंद करुन घ्या.
- गाळणीनंतर ब्रशने चांगली घासून घ्या. जेणेकरुन त्यात अडकलेली घाण निघून जाईल
- नंतर ब्रशला भांडी घासण्याचा साबण लावा. त्याने गाळणी चांगली घासून काढा व नंतर पाण्याने धुवून घ्या.
- ही ट्रिक एकदम सोप्पी आहे त्यामुळं गाळणीला चिकटलेली घाण अगदी काही मिनिटांत निघेल.
- महिन्यातून एकदातरी या पद्धतीने चहाची गाळणी स्वच्छ करुन घ्या.
- सगळ्यात आधी पाणी गरम करुन घ्या. पाणी गरम झाले की त्यात भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड सोप टाका
- आता यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस टाकून पाणी चांगले उकळून घ्या
- त्यात चहाची गाळण काही वेळ ठेवा त्यानंतर टुथपेस्ट वापरुन चहाची गाळण साफ करुन घ्या
- चहाची गाळण या ट्रिकनेही तुम्ही स्वच्छ करु शकता.