ईशा अंबानीचा हा कॉटन कुर्ता सेट उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट; किंमत किती माहितीये?

Isha Ambani Kurta Set Price : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कायमच लक्ष वेधताना दिसतो. अगदी त्यांची लेक ईशा अंबानीसुद्धा यास अपवाद नाही. 

सायली पाटील | Updated: Mar 14, 2024, 03:28 PM IST
ईशा अंबानीचा हा कॉटन कुर्ता सेट उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट; किंमत किती माहितीये? title=
Isha Ambani wins hearts as she wore simple summer kurta know the price latest update

Isha Ambani Kurta Set Price : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या (Anant Ambani Radhika Merchant Pre wedding) प्री वेडिंग समारंभानंतर मुकेश अंबानी त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत परतलं. इथं अंबानी कुटुंबाचे प्री वेडिंग सोहळ्यातील फोटो संपण्याचं नाव घेत नाहीत तोच आता काही नव्या फोटोंवर सर्वचजण भाळले आहेत. कारण, त्यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांची लेक, जावई आणि त्यांची नातही दिसत आहे. 

अंबानींची लेक ईशा, तिचा पती आनंद पिरामल यांचे काही नवे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये आनंद आणि ईशा त्यांच्या क्रिष्णा आणि आदिया या दोन्ही मुलांच्या शाळेबाहेर (Pre School) असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींनी टीपलं. यावेळी ही जोडी Casual Look मध्ये दिसली. पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि डेनिम अशा क्लासिक कॉम्बिनेशनमध्ये आनंद पिरामल शोभून दिसत होता. 

ईशानंही पांढऱ्या रंगाच्या ब्लॉक प्रिंटेड कुर्त्याला पसंती दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नो मेकअप लूक, मोकळे केस, हँडबॅग असा तिचा एकंदर लूक होता. पलाझोमुळं तिच्या या लूकला थोडा ट्रेंडी टच मिळत होता. ईशाचा हा लूक इतका कमाल होता, की सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु झाली. महिला वर्गात तर, तिच्या या लूकची इतकी चर्चा पाहायला मिळाली, की अनेकजणींनी ईशासारखाच कुर्ता हवा यासाठी इंटरनेटची मदतही घेतली. सरतेशेवटी या बहुचर्चित कुर्त्याची किंमत आणि ब्रँडही ओघाओघानं समोर आला. 

हेसुद्धा वाचा : वडापाव जगात भारी! मानाच्या यादीत मिळवलं स्थान, पाहा इतरही पदार्थ 

 

इंटरनेटवरील अनेक चर्चांनुसार रिद्धी सुरीच्या Drzya या ब्रँडचा हा कुर्ता आणि पलाझो सेट होता. Hoor Hand Block Printed ( Blue Boota) Kurta अशा नावानं हा कुर्ता वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा कुर्ता सेट 9600 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्हीही Summer Collection मध्ये या सेटला समाविष्ट करू पाहताय का? 

Isha Ambani wins hearts as she wore simple summer kurta know the price latest update

राहिला मुद्दा ईशाच्या स्टायलिंगचा, तर तिनं या कुर्त्यावर फार अॅक्सेसरीज घातल्या नव्हत्या. एक सोन्याची चैन, साजेशा  बांगड्या, बॅलेट शूजनं तिनं लूक परिपूर्ण केला होता. ईशाचा हा लूक आणि त्याहूनही तिचा कुर्ता उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळं हा कुर्ता किंवा अगदी असाच एकाता सुती, अर्थात कॉटन कुर्ता सेट तुम्ही उकाड्याच्या या दिवसांमध्ये सहजपणे वापरू शकता.