A B C D E वरून भारतीय मुलींची संस्कृत नावे, अर्थ तुमचं मनं जिंकेल

Sanskrit Baby Girl Names : मुलांची नावे ठेवताना इंग्रजी शब्दांचा देखील अनेक पालक विचार करतात. इंग्रजी अल्फाबेट्सनुसार मुलींची संस्कृत नावे आणि त्याचा अर्थ. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 13, 2023, 06:21 PM IST
 A B C D E वरून भारतीय मुलींची संस्कृत नावे, अर्थ तुमचं मनं जिंकेल  title=

Indian Baby Girls Name And Meaning : मुलांकरता नावे निवडताना पालक वेगवेगळ्या अक्षरांचा विचार करतात. कधी मराठी वर्णाक्षरे निवडतात तर कधी इंग्रजी अल्फाबेटचा विचार करतात. पालकांनी संस्कृत भाषेतील मुलींची नावे ठेवायची आहेत पण त्याची सुरूवात इंग्रजी अक्षराने होणारी आहे. पालकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पालक आपल्या मुलींसाठी ही नावे नक्की निवडू शकतात. या नावांचे अर्थ देखील खास आहेत. तुम्ही मुलींसाठी नक्की विचार करू शकता. 

अध्याना (Adhyana) -  ज्ञान, प्रकाश ज्याचा उगम होतोय..या नावाचा शुभांक 7 आहे. भारतीय संस्कृतीतील हे संस्कृत नाव आहे. तुम्ही मुलीसाठी हे नाव नक्की निवडू शकता. 

अदरिका (Aadrika) - डोंगर; टेकडी; एक अप्सरा किंवा आकाशीय अप्सरा. अशा अर्थाचे 'अदरिका' नावाचे अर्थ आहे. या नावाचा शुभांक 8 असा आहे. 

अहेली (Aheli) - 'अहेली' या नावाचा अर्थ आहे अतिशय पवित्र. हे नाव मुलींना नक्की ठेवा यावरून तुमच्या मुलीचं वेगळेपण अधोरेखित होईल. या नावाचा शुभांक 8 आहे. 

अत्रेयी (Atreyee)- 'अत्रेयी' हे नदीचे नाव आहे. तसेच वैभवाचे पात्र देखील असा त्याचा अर्थ आहे. 'अत्रेयी' नावाचा शुभांक 5 आहे. अतिशय युनिक नाव मुलीसाठी नक्की निवडू शकता. 

अवनी (Avani) - 'अवनी' हे संस्कृत वंशाच्या मुलीचे नाव आहे. "पृथ्वी" सारख्या अर्थासह, अवनी सारखे नाव प्रामाणिकपणा आणि उबदारपणा, धैर्य आणि उदारतेचे आभा दर्शवते, असा याचा अर्थ आहे. अवनी हे तीन अक्षरी नाव मुलीसाठी असू शकतं अतिशय खास. 

बेला (Bela) - 'बेला' हे दोन अक्षरी नाव अतिशय खास आहे. संस्कृतमधील हे मुलीचे नाव अतिशय खास आहे. अतिशय पवित्र हृदयाची, पवित्र व्यक्तिमत्व असा त्याचा अर्थ आहे. या नावाचा शुभांक 11 असा आहे. बेला या नावाचा अर्थ वेळ असा देखील आहे. 

बिलवा (Bilwa) - एक पवित्र पान, शुभ फळ - बाईल, शिवपूजेत वापरले जाणारे पवित्र पान असा याचा अर्थ आहे. 

चेतल (Chetal ) - जीवन, चैतन्य असणे असा 'चेतल' या नावाचा अर्थ आहे. चेतल हे अतिशय हटके मुलींचं नाव आहे. 

दिजुल (Dijul) - 'दिजूल' या मराठी नावाचा अर्थ खूप हटके आणि वेगळी आहे. निर्दोष, द्रिषा, पर्वताचा स्वामी, दर्शी, आशीर्वाद; भगवान श्रीकृष्ण; चंद्रप्रकाश असा देखील याचा अर्थ आहे. मुलीसाठी या नावाचा नक्की विचार करू शकता. 

धारा (Dhara) - 'धारा' या नावाचा अर्थ आहे संतत धार, सतत प्रवाह; पृथ्वी; टिकवणे आणि जतन करणे यासारखे अर्थ या नावाचे आहेत.  

इधा (Eadha) - प्रगती, पैसा असा या दोन अक्षरी नावाचा अर्थ आहे. इधा हे नाव मुलीसाठी नक्की निवडू शकता. 

इकशिका (Ekshika) - नयन, डोळे असा 'इशकिया' या नावाचा अर्थ आहे. प्रेमळ असे हे नाव तुमच्या लाडक्या लेकीला द्या.  

इनिया (Eniya) - 'इनिया' तत्व, नियम, खरेपणा, सच्चाई असे या नावाचे अर्थ आहे. या अर्थाप्रमाणे मुलीमध्ये गुण उतरतील.