Flax Seeds Vs Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी काय खाल; दोघांचेही पौष्टिक गुणधर्म जाणून घ्या

Flax Seeds Or Chia Seeds: चिया सिड्स आणि आळशी हे दोन्हीही सुपरफुड्स आहेत. मात्र वजन कमी करण्यासाठी काय खाल?

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 1, 2024, 06:13 PM IST
Flax Seeds Vs Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी काय खाल; दोघांचेही पौष्टिक गुणधर्म जाणून घ्या title=
Flax seeds or chia seeds which is better for weight loss in marathi

Flax Seeds Or Chia Seeds: सुपर फुडच्या लिस्टमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यातीलच एक म्हणजे आळशी आणि चिया सिड्स यांचाही  सुपरफुडमध्ये समावेश होतो. पण या दोघांचा आरोग्यासाठी काय फायदा. कोणत्या गोष्टीमुळं वजन कमी होते, याविषयी जाणून घेऊया सविस्तर. आळसी आणि चिया सिड्स यापैकी आहारात कोणत्या सुपरफुडचा समावेश करावा याचीही माहिती घेऊया. 

आळशी आणि चिया सिड्स या दोघांचे गुणधर्म आपापल्या पद्धतीने शरीरासाठी फायदेशीर आहेतच. पण दोघांपैकी कोणत्या बियांचा आहारात समावेश केल्यास लाभ होऊ शकतो. याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. आळशी आणि चिया सीड्समध्ये कोणते पोषक तत्वे असतात, याची आपण सर्वात पहिले माहिती घेऊया. 

आळशीत असलेले पोषक तत्वे

प्रोटीन-8 ग्रॅम
कॅल्शियम-255 मिलीग्रॅम
आयर्न- 5.73 मिलीग्रॅम
पोटॅशियम- 813 मिलीग्रॅम
फॉस्फोरस-642 मिलीग्रॅम
मॅग्नीशियम- 392 मिलीग्रॅम
ओमेगा 3- 6 ग्रॅम

चिया सीड्समध्ये असलेले पोषक तत्वे

प्रोटीन- 6 ग्रॅम
फायबर-34.4 मिलिग्रॅम
कॅल्शियम-631 मिलिग्रॅम
आयर्न-7.72 मिलिग्रॅम
मॅग्निशियम-335 मिलिग्रॅम
फॉस्फोरस-407 मिलिग्रॅम
ओमेगा 3- 4 ग्रॅम्स

आपण आळशी आणि चिया सिड्स या दोघांमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दलही माहिती घेतली. मात्र, आळशीत Lignans हे तत्व असते. जे चिया सिड्समध्ये आढळत नाही. मेनोपॉज दरम्यान महिलांना ज्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यात Lignans  हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. 

आळशीचे फायदे 

जर तुम्हाला वेट लॉस करायचे असेल तर तुम्ही बिनदिक्कत आळशीचा आहारात समावेश करु शकता. यात भरपुर प्रमाणात फायबर असते. फायबरच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

आळशीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल हे गुणधर्म असतात. हे शरीरातील व बाहेरील दोन्ही प्रकारचे संसर्ग रोखते. त्यामुळं सर्दी-खोकला नियंत्रणात राहतो. त्यामुळं रोज थोड्या प्रमाणात आळशी खाल्ली पाहिजे. 

हृदयासाठी निरोगी

आळशी वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. अशातच हृदयाच्या आरोग्यासाठी आळशी खूप फायदेशीर आहे. आळशी खाल्ल्याने हृदयात ब्लोकेजची समस्या कमी होते. 

चिया सिड्सचे फायदे

हाडांना बळकटी देते

चिया सिड्समध्ये भरपुर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी व दातांसाठी खूप लाभदायक असते. 

चांगल्या झोपेसाठी लाभदायक

जर तुम्हाला शांत झोप येत नसेल किंवा रात्री गाढ झोप लागत नसेल तर चिया सिड्सचा आहारात समावेश करा. यात टिप्टोफेन नावाचे गुणधर्म असते. ज्यामुळं शांत झोप येण्यास मदत होते. त्याचबरोबर डिप्रेशन आणि नैराश्यसारख्या समस्या दूर होतात. 

चिया सीड्सचे अन्य फायदे

चिया सीड्सचा सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता, शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठीदेखील केला जातो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)