मुलांना द्या 25 जबरदस्त नावांपैकी एक नाव, जीवनात कधीच होणार धनाची कमतरता

Baby Names 2023 : 2023 मधील मुलंची ही जबरदस्त नावे, ज्या नावांमुळे तुमच्या घरात नांदेल सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 13, 2023, 03:49 PM IST
मुलांना द्या 25 जबरदस्त नावांपैकी एक नाव, जीवनात कधीच होणार धनाची कमतरता title=

Baby Name Ideas 2023: प्राचीन काळापासून मुलांची नावे अतिशय विचारपूर्वक ठेवली जातात. मुलाचे भाग्य आणि व्यक्तिमत्व देखील त्याच्या नावाशी जोडलेले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, मुलाच्या नावाचा परिणाम पालकांवरही होतो? होय, पालक आपल्या मुलाचे नाव सर्वात जास्त उच्चारतात. अशा स्थितीत पुण्य प्राप्ती होऊ शकेल अशी काही नावे ठेवली तर त्या नामाचे वारंवार उच्चार केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि देवी लक्ष्मीचा वास होतो. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच नावांबद्दल सांगत आहोत, त्‍यांचे वारंवार नाव घेतल्याने घरात सुख-समृद्धी, समृद्धी, ऐश्वर्य नांदू शकेल. 

मुलांची नावे 

राम - श्रीप्रभूरामाचे नाव, सतत राहिल सकारात्मकता 

लक्ष्मी -लक्ष्मी देवीचे नाव सतत राहिल कृपाशिर्वाद

सीता - प्रभू रामाची पत्नी सीता, जानकी असा याचा अर्थ 

वैष्णवी - वैष्णवी हे देखील एका देवीचे नाव आहे

रूद्र - रुद्र हे नाव अतिशय युनिक असून रुद्राक्ष असा याचा अर्थ आहे

बद्री - विष्णू देवाचे नाव आहे. बद्री हे नाव अतिशय युनिक आहे.

नारायण - नारायण हे नाव अतिशय जुनं नाव असलं तरीही या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. विष्णूचे हे नाव आहे 

देवर्षि - देवर्षि हे देवाचे गुरू, देवांचे ऋषी असा याचा अर्थ आहे. देवर्षि हे नाव अतिशय युनिक असून नावाे वेगळेपण समजून घ्या. 

गोविंद- गोविंद हे देखील अतिशय जुनं, पारंपरिक नाव आहे. गोविंद म्हणजे आनंद या नावाचा अर्थ अतिशय खास. 

कान्हा - कान्हा हे श्रीकृष्णाचे बालरुप. या नावाचा अतिशय युनिक अर्थ आहे. कान्हा हे नाव देखील खास आहे. 

शिव - शिव शंकराचे हे नाव असून मुलासाठी दोन अक्षरी नावाचा नक्की विचार करा. 

शंकर  - शंकर हे शिव शंकराचे नाव. शंकर हे  नाव देखील मुलासाठी ठेवू शकता. 

कन्हैया - कन्हैया या नावाचा अर्थ म्हणजे श्रीकृष्ण. कन्हैया या नावाचा अर्थ परमेश्वर असून या नावाचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. 

कृष्णा - कृष्णा हे नाव अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ खूप खास आहे. हे नाव नक्की मुलाला देऊ शकतो. 

राधा - राधा... दोन अक्षरी मुलीचे नाव. या नावाचा विचार मुलीसाठी करू शकता. राधा हे अतिशय युनिक नाव आहे. 

हरि  - हरि हे नाव दोन अक्षरी असून प्रभू रामाचे नाव असा याचा अर्थ आहे. 

सूर्य - सूर्य हे नाव आपण सहसा मुलासाठी दिलेले ऐकलेलं नाही पण या नावाचा विचार करायला हरकत नाही. 

त्रिलोकेश - त्रिलोकेश हे चार अक्षरी छान नाव आहे. या नावाचा अर्थ त्रिलोक असा आहे.

श्रीवत्स - श्रीवत्स हे नाव खास आहे. श्री असे देखील त्याचे शॉर्ट फॉर्म होऊ शकते.