मुलींची 9 नावे ज्यामुळे घरी येतं सौभाग्य, ऐश्वर्य आणि समाधान

Baby Girl Names And Meaning : मुलींसाठी निवडा अतिशय युनिक आणि अर्थपूर्ण नावे.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 27, 2024, 10:56 AM IST
मुलींची 9 नावे ज्यामुळे घरी येतं सौभाग्य, ऐश्वर्य आणि समाधान  title=

घरात बाळाचा जन्म झाला की, लगबग सुरु होते ती नावाची. या नावांमध्ये तुम्ही खास नावांचा विचार करु शकता. कारण मुलींचा जन्म हा प्रत्येक घरात सोहळ्याप्रमाणे असतो. लेक घरात आली की, लक्ष्मीची पाऊलं घरात पोहोचली असं म्हटलं जातं. अशावेळी जर तुम्ही लेकीला तितकंच सुंदर नाव दिलंत तर नक्कीच घरावर विशेष कृपाशिर्वाद राहील. 

सान्वी 

सान्वी म्हणजे माता लक्ष्मी, ज्ञान आणि सौभाग्य असा देखील याचा अर्थ आहे. पारंपरिक तरीही मॉडर्न टच असलेलं हे परफेक्ट नाव. 

तरुणिमा 

चार अक्षरी असलेलं हे नाव अतिशय युनिक आहे. तजेलदारपणा, नवीनपण, ताजेपणा असा या नावाचा अर्थ आहे. या नावातही ऐश्वर्य, समाधान आणि शांती दडलेली आहे. लेकीच्या आगमनाने हे संस्कार तुमच्या घरावर घडतील. 

कृति 

कृति हे नाव अतिशय छोटं आणि प्रेमळ नाव आहे. या नावाचा अर्थ आहे भाग्यशाली लेक. जर घरी बऱ्याच वर्षांनी मुलीचा जन्म झाला असेल तर या नावाचा नक्कीच विचार करा. कृतीचा अर्थ आहे परमेश्वराची रचना. त्यामुळे तुमच्या लेकीचा जन्म हा परमेश्वराची कृति आहे. 

(हे पण वाचा - Baby Names : मान्सून ऋतुमध्ये जन्मलेल्या मुला-मुलींसाठी नावे आणि अर्थ)

अवंतिका 

अवंतिका हे नाव अतिशय जुनं वाटत असलं तरीही या नावात दडलाय खास अर्थ. कोणत्याही काळात मुलीसाठी हे नाव अतिशय खास ठरतं. 'राजकुमारी' 'पवित्र' असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव मुलीसाठी अतिशय खास असं समजलं जातं. 

यशस्विनी 

यशस्विनी या नावात खूप मोठा अर्थ दडला आहे. यशस्वी आणि प्रसिद्ध असा या नावाचा अर्थ आहे. समृद्ध करणारं हे नाव लेकीसाठी नक्की निवडा. 

ऐश्वर्य 

ऐश्वर्य या नावातच याचा अर्थ दडलेलं आहे. भाग्य आणि प्रचुरताचं प्रतिक असं हे नाव आहे. ऐश्वर्या हे नाव आपल्याला माहितच आहे. पण ऐश्वर्य हे नाव देखील युनिक आणि वेगळं आहे. 

अनाया 

अनाया या नावाचा अर्थ आहे भाग्य आणि सौभाग्य असा आहे. अनाया या नावाचा अर्थ युनिक आहे. करुणामय असा या नावाचा अर्थ देखील आहे. 

भव्या 

भव्या या नावाचा शाब्दिक अर्थ आहे महान, भव्य, शानदार. मुलीच्या जीवनता यश, भव्यपणा असावं असं वाटत असेल भव्या या नावाचा विचार करा.