Alia Bhatt discharged from hospital : अभिनेता आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूरने (ranbir kapoor) 6 नोव्हेंबर रोजी लेकीचं स्वागत केलं आणि गुरुवारी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आलिया आणि लेकीला घरी घेवून जाण्यासाठी रणबीर पोहोचला होता. आलिया आणि लेकीला घेवून रुग्णालयातून बाहेर पडतानाचा रणबीरचा व्हिडीओ (ranbir kapoor video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान रणबीरला देखील स्पॉट करण्यात आले आहेत. (Alia Bhatt discharged from hospital)
आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मुलीच्या जन्माची माहिती आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी दिली. आलियाने रिलायन्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला. (bhatt and kapoor family)
आलियाने सोशल मीडियावर मुलगी झाल्याची घोषणा करताचं अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. शिवाय काही सेलिब्रिटी आलिया आणि चिमुकलीला भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले. (alia bhatt and ranbir kapoor baby)
आजीचा आनंद गगनात मावे ना!
रणबीर कपूर वडील झाला आणि नितू कपूर (neetu kapoor) आजी याचा आनंद नीतू सिंग यांच्या चेहऱ्यावर ओसडून वाहत आहे (alia bhatt daughter). सगळ्यांना मुलं झालं की एकच उत्सुकता असते. एवढंच नाहीतर, जेव्हा रणबीरने पहिल्यांदा बाळाला कडेवर घेतलं तेव्हा तो प्रचंड भावुक झाल्याचं देखील नीतू यांनी सांगितलं.