मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.

Updated: Jul 14, 2018, 08:10 AM IST
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई: येत्या २४ तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज दुपारी १ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. ही भरती मोसमातील सर्वात मोठी भरती असेल.. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.

मालवण तालुक्यालाही समुद्री उधाणाचा  फटका 

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा मिळाला असतानाच कोकणातही पावासाचा मोठा फटका नागरिकाना बसत आहे. सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यालाही समुद्री उधाणाचा मोठा फटका आज बसला. तळाशील आणि आचरा येथील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. असंच उधाण राहिल्यास पाणी वस्तीत घुसण्याची भीती आहे.  आचरा भागात तर अनेक घरांना धोका बसण्याची शक्यता आहे. समुद्र आणि घरांमध्ये काही मीटर अंतर राहिलंय.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे.. बाजारभोगाव गावामध्ये कासारी नदिचं पाणी घुसलं... अधिच कासारी नदिच पाणी कोल्हापूर राजापूर रस्त्यावर आल आहे. यामध्ये आता कासारी नदिच पाणी बाजारभोगाव  येथे आल्यान हा मार्ग वाहतूकीसाठी ठप्प झालाय.