आंबनेळी दुर्घटनेत वाचलेल्या प्रकाश सावंतांना क्लीन चीट

प्रशांत भांबीड आणि बाबू झगडे असे दोन चालक त्या बसमध्ये होते.

Updated: Aug 30, 2018, 08:21 PM IST
आंबनेळी दुर्घटनेत वाचलेल्या प्रकाश सावंतांना क्लीन चीट title=

रत्नागिरी: आंबेनळी घाट बस दुर्घटना प्रकरणी दापोली कृषी विद्यापीठाने प्रकाश सावंत देसाई यांना क्लिनचिट दिली आहे. अपघातापूर्वी दोन व्यक्ती बस चालवत होत्या असेही दापोली कृषी विद्यपीठाने अहवालात नमूद केले आहे. प्रशांत भांबीड आणि बाबू झगडे असे दोन चालक त्या बसमध्ये होते. त्याचा पुरावा देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ घाटातून जाणाऱ्या एका पर्यटकाने चित्रित केला आहे. यात दापोली कृषी विद्यापीठाची ती बस घाटामध्ये थांबली होती आणि त्यातून बसचालक बाबू झगडे खाली उतरताना व्हिडिओत चित्रित झाले आहे. त्यामुळे अपघातापूर्वी दोन जणांनी गाडी चालवली असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.