मुंबई : जर तुम्हाला ताज्या बातम्या हव्या असतील परंतु ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. तरी देखील तुम्हाला बातम्या ऑनलाईन वाचता आणि पाहता येणार आहे. इतकंच नाही तर यासाठी तुमच्याकडे फोनची मेमरी देखील कमी असेल तरी तुमची ही समस्या आता दूर होणार आहे.
झी डिजिटलने तंत्रज्ञानाचा वापर वाढवून प्रोग्रेसिव्ह वेब अॅप्स (PWA) लाँच केला आहे. हे अॅप 9 भाषांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातम्यांसह 13 ब्रँडसाठी काम करेल. यामुळे झी डिजिटल हा देशातील पहिला मीडिया आणि एंटरटेनमेंट बिझनेस ग्रुप बनला आहे. या अॅपच्या लाँचिंगमुळे युजर्स कमकुवत नेटवर्क आणि कमी मेमरी असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये देखील ताज्या बातम्या वाचू शकतील.
हे देशातील आणि शक्यतो जगातील सर्वात मोठे पीडब्ल्यूए लाँच आहे. या लाँचिंगसह झी डिजिटल जगातील फेसबुक, ट्विटर, अलिबाबा, उबर, लिंक्डइन सारख्या जगातील दिग्गजांमध्ये सामील झाला आहे.
आता भारतातील टॉप ब्रॉडकास्ट ZeeNews.com, Zee24Ghanta.com, ZeeHindustan.in, Zee24Kalak.in, 24Taas.com, ZeeRajasthan.com, ZeeBiharJharkhand.com, ZeeUpUk.com आणि ZeeMpCg.com च्या यूजर्सला मोबाईल वेबवर PWA चा फायदा होणार आहे. मागील एका वर्षात या ब्रँडच्या मासिक युजर्समध्ये 65 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. आता कंपनीने या लाँचनंतर ऑर्गेनिक ट्रॅफिकमध्ये 200 टक्के वाढीचं लक्ष ठेवलं आहे.
नवीन मोबाईल वेब अॅप युजर्सला त्यांच्या आवडत्या न्यूज ब्रँडचे आयकॉन त्यांच्या मोबाईल होम स्क्रीनवर ठेवण्यास मदत होईल. या अॅपमुळे आता खराब नेटवर्क असलेल्या भागात आणि कमी स्टोरेज असलेल्या मोबाईलवर देखील युजर्सला बातमी वाचताना समस्या येणार नाही. या अॅपमुळे युजर्सला ऑफलाईन ब्राउजिंगचा पर्याय देखील मिळेल.
ZEE डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित चड्डा म्हणाले की, 'भारतातील सर्वात मोठे मीडिया हाऊस असल्याने शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं लक्ष आहे. प्रगतशील वेब अॅप्स किंवा पीडब्ल्यूए मुळात असे तंत्रज्ञान आहे. जे युजर्स डिव्हाइसचे स्थान (फोन, लॅपटॉप) वापरल्याशिवाय हा अॅप वापरण्याची अनुमती देते. हे एक उत्तम तंत्र आहे. जे वेबपेज जलद लोड करते आणि फोनची मेमरी देखील वापरत नाही. छोट्या शहरांतील युजर्ससाठी हे खूप खास आहे कारण तेथे उच्च प्रतीच्या स्मार्टफोनची सुविधा उपलब्ध नाही.'
ZEE Digital मोबाईलची पहिली रणनीती म्हणजे मोबाईल वेब एक्सपीरियन्सला त्याच्या प्रमुख ब्रॉडकास्ट ब्रँडसाठी पीडब्ल्यूएमध्ये रुपांतरित करणे आणि युजर्सला अखंड बातम्या पुरविणे.
रोहित चड्डा पुढे म्हणाले की, 'या नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आमच्या वेबसाईटचे पेज उघडण्याची गती सर्वोत्कृष्ट बनली आहे. प्रसारण उद्योगात असल्यामुळे, आमची लाईव्ह टीव्ही आणि व्हिडिओ, जे सर्वात जास्त डिजिटल वर पाहिले जातात, युजर्सला आवडतात. म्हणूनच, नवीन पीडब्ल्यूए आवृत्तीमध्ये Watch हा ऑप्शन देण्यात आला आहे. ज्यामुळे वृत्तवाहिणी किंवा कोणताही व्हिडिओ सहज पाहता येणार आहे.'