तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी...

तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या वर्षीपासून तुमचा पगार कमी होणार आहे. कारण तसा 

Updated: Dec 10, 2020, 06:11 PM IST
तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या वर्षीपासून तुमचा पगार कमी होणार आहे. कारण तसा कायदाच मंजूर करण्यात आलाय. तुम्हाला आता किती पगार मिळतोय, आणि पुढच्या वर्षीपासून तुमचा पगार किती कमी होईल, ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कोरोना आणि आर्थिक मंदीमधून आता कुठे सावरत असताना नवा धक्का बसला आहे. जे जे नोकरी करतात, त्या सगळ्यांचा पगार पुढच्या वर्षीपासून कमी होणार आहे. कारण गेल्या वर्षी केंद्र सरकारनं संसदेत वेज कोड विधेयक मंजूर केलं होतं. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून पगाराचा नवा नियम लागू होतोय. 

हातात येणाऱ्या पगाराची रक्कम कमी होणार आहे. कर्मचाऱ्याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाहीत. ज्यांचा पगार जास्त त्यांना याचा जास्त फटका बसणार आहे. कारण जास्त पगारामध्ये भत्यांची रक्कमच जास्त असते. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्यानं कंपन्यांकडून हा भारही कर्मचाऱ्यांवरच टाकला जाण्याची शक्यता आहे

पगार कमी होणार असला तरी पगाराच्या या नव्या नियमाचा तुम्हाला रिटायर्ड झाल्यानंतर फायदा मिळणार आहे. 

या महिन्याचे काही दिवस आणि पुढच्या वर्षी एप्रि लपर्यंतचे तीन महिने अशी मजा करुन घ्या... नंतर हाती पैसा कमी येणार आहे. पुढच्या वर्षीपासून पगार कमी होणार आहे, हे आम्ही आताच सांगतोय.... त्यामुळे आतापासूनच पैशांचं योग्य सेव्हिंग, गुंतवणूक करा.