प्रेमात पडताचं होतात असे बदल; तुमच्यासोबत असं झालं आहे का?

तुम्ही कोणाच्या प्रेमात आहात?

Updated: Oct 29, 2021, 11:04 AM IST
प्रेमात पडताचं होतात असे बदल; तुमच्यासोबत असं झालं आहे का? title=

मुंबई  :  प्रेम ही एक अशी भावना आहे ज्यामध्ये प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो. राग , रूसवे तर सर्वचं नात्यामध्ये असतात पण या खास नात्यात जवळचा व्यक्तच्या भावनांना ठेच पोहचू नये याचा सतत प्रयत्न असतो. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे अनेक हावभाव हे सूचित करतात की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात आहात की नाही. काही न सांगता तुम्ही जाणून घेवू शकता समोरच्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम आहे का? असं थेरपिस्ट सांगतात. 

प्रेमात असलेल्या व्यक्तीचे कसे असतात हावभाव

- सतत त्याच व्यक्तीचा विचार - जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच व्यक्तीचा विचार करता ज्यांच्या प्रेमात पडता. वेळोवेळी तुम्हाला त्याचे शब्द आठवतात. भेटी आठवतात. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही नक्कीचं प्रेमात आहात. 

- ती व्यक्ती कायम जवळ राहवी अशी भावना - जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा असतो. डेटिंग मानसशास्त्रज्ञ मॅडेलीन मेसन रोएंट्री म्हणतात की आपण त्या व्यक्तीच्या उपस्थितीसाठी तळमळत असतो. तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ राहण्यासाठी सतत प्रयत्न करत असता. 

- त्या व्यक्तीवरून नजर हटत नाही - आपल्याला नेहमी प्रिय व्यक्तीला पाहायचे असते. तुम्ही त्याच्याकडे पुन्हा पुन्हा टक लावून पाहत राहता. मानसशास्त्रज्ञ मार्क हेक्स्टर म्हणतात की हे सर्वात स्पष्ट लक्षणांपैकी एक आहे की आपण एखाद्याच्या प्रेमात पडत आहात. तुम्ही त्याच्याकडे पाहणे थांबवू शकत नाही कारण तो तुमच्यासाठी जगातील सर्वात सुंदर आणि आकर्षक व्यक्ती असतो.

- वेळ कधी संपतो कळत नाही - जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडत असाल तर शक्यता आहे की त्यांच्यासोबतचा तुमचा वेळ खूप लवकर निघून जाईल. त्यामुळे त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा तुमच्या मनात असते.