Kashi Halwa Recipe: 2023 चा शेवटचा डिसेंबर महिना सुरु आहे. या महिन्या अखेरिस आपण 2023 चा निरोप घेऊ आणि 2024 वर्षात पदार्पण करु. दरम्यान 2023 च्या गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक सर्च झालेली डिश कोणती? हे तुम्हाला महिती आहे का? या डिशचे नाव, ती कशी बनवायची? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 2023 मध्ये काशी हलवा सर्वाधिक सर्च करण्यात आला. काशी हलवा पेठ्यापासून बनवला जातो. याची चव न विसरता येण्यासारखी आहे. पेठ्याला काशीफळ असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच याचे नाव काशी हलवा असे ठेवण्यात आले आहे. ही कर्नाटकातील एक प्रसिद्ध पारंपारिक मिठाई आहे.
यावर्षी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात काशी हलव्याची रेसिपी गुगलवर सर्च केली. काशी हलवा कसा बनवायचा? हे तुम्हीदेखील जाणून घ्या. कारण काशी हलवा बनवणे खूपच सोपे आहे.
काशी हलवा बनवण्यासाठी तुम्हाला 500 ग्राम सफेद दुधी भोपळा, 150 ग्राम साखर, 2 मोठे चमचे तूप, 7 ते 9 केसरचे धागे याची गरज आहे.
काशी हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी पांढरा दूधी भोपळा घेऊन या. भोपळा जास्त पिकलेला नसेल याची काळजी घ्या. त्यानंतर भोपळ्याची साल वेगळी करा. आता भोपळा किसा आणि पाण्यात ठेवा.
यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात तूप टाकून गरम करा. तूप गरम झाल्यानंतर किसलेला भोपळा टाका. याला मिक्स करुन चांगला शिजवा आणि 3 ते 4 मिनिटांनी साखर टाका. भोपळ्याच्या किसामध्ये साखर चांगली मिक्स करत राहा. पाणी आटेपर्यंत ही प्रक्रिया करत राहा. यानंतर 1 चमचा तूप टाका आमि मिक्स करुन पाणी निघेपर्यंत शिजवा.
आता दुधामध्ये भिजवलेले केसर हलव्यामध्ये टाकून सुखेपर्यंत शिजवा. सुखल्यानंतर कापलेले काडू टाकून 1 मिनिटे शिजवा. आता हलवा तयार झाला आहे. यावर वरुन ड्रायफ्रूट्स टाकून डिश तयार होईल.