यशवंत सिन्हा यांचा अखेर भाजपला रामराम

भाजपला एक मोठा धक्का

शैलेश मुसळे | Updated: Apr 21, 2018, 02:36 PM IST
यशवंत सिन्हा यांचा अखेर भाजपला रामराम title=

पटना : भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. सरकारवर नाराज असलेले असंतुष्ट नेते आज पटनामध्ये एकाच ठिकाणी जमले आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन यशवंत सिन्हा यांनी केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षा सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करुया आणि कोणीही पद नाही स्विकारणार. भाजपसोबतचे असेलेल सर्व संबंध तोडतो.' 

यशवंत सिन्हा यांनी बिहारमध्ये मोठे आंदोलनं केली आहेत. केंद्र सरकारवर यशवंत सिन्हा हे अनेक दिवसांपासून टीका करत होते. या अधिवेशनात भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, बिहारचे नेते तेजस्वी यादव, शरद यादव आणि जेडीयूचे नाराज नेते उदय नारायण चौधरी या अधिवेशनात येणार आहेत. काँग्रेस, राजद, आप, सपा यांच्यासह भाजप-जेडीयू मधील असंतुष्ट नेते यावेळी एकत्र येणार आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर आता किती प्रभाव पडेल हा येणारा काळच सांगेल.